पुणे पालिका विरोधी पक्षनेतेपद मनसेला

पुणे महापालिकेत महायुतीतले तीनही पक्ष स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करणार आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी पुण्यात ही माहिती दिली. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मनसेला मिळणार आहे.

Updated: Mar 2, 2012, 08:38 AM IST

www.24taas.com, मुंबई

पुणे महापालिकेत महायुतीतले तीनही पक्ष स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करणार आहेत. भाजप नेते विनोद तावडे यांनी पुण्यात ही माहिती दिली.  त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मनसेला मिळणार आहे.

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मनसेनं दावा सांगितला होता. आता स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येणार असल्याने मनसेचा हा दावा खरा ठरला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीला मनसे दे धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.

निवडणुकीत ५१ जागा जिंकत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. तर २९ जागा जिंकत मनसे दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. महायुतीच्या एकूण जागांची संख्या मनसेपेक्षा जास्त असली तरी शिवसेना, भाजप आणि रिपाई या पक्षांनी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे नियमांनुसार विरोधी पक्षनेतेपद मनसेला मिळायला हवं, असा दावा मनसेनं केला होता.