बिल्डरसाठी, प्रतिबंधित जागेत इमारती

लष्कराच्या विमानतळाजवळच्या प्रतिबंधित झोनमध्ये नियम डावलून अकरा मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. SRA योजनेअंतर्गत या इमारतींमुळे सुरक्षेशी छेडछाड झालीय. आणि हे सगळं चाललंय ते एका बिल्डरच्या फायद्यासाठी.

Updated: May 19, 2012, 10:50 AM IST

www.24taas.com, पुणे

लष्कराच्या विमानतळाजवळच्या प्रतिबंधित झोनमध्ये नियम डावलून अकरा मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. SRA योजनेअंतर्गत या इमारतींमुळे सुरक्षेशी छेडछाड झालीय. आणि हे सगळं चाललंय ते एका बिल्डरच्या फायद्यासाठी.

लोहगावमधल्या हवाई दलाच्या विमानतळाला लागून इमारती उभ्या राहिल्या आहेत. हवाई दलाने परवानगी नाकारल्यानं गेल्या वर्षीपासून या इमारतींचं बांधकाम  बंद आहे. विमानतळापासून 100 मीटरपर्यंत कुठलंच बांधकाम करता येत नाही. आणि 500 मीटर पर्यंत फक्त 4 मजल्यांपर्यतच बांधकाम करता येतं. तरीही 500 मीटर्सच्या परिसरातच या अकरा मजल्याच्या इमारती उभ्या आहेत. हे सगळं ‘रविराज क्रिएशन’ या बिल्डरच्या फायद्यासाठी करण्यात आलंय. हवाई दलाच्या पत्रांकडे दुर्लक्ष करुन SRA चे अधिकारी थांबले नाहीत तर बिल्डरच्या फायद्यासाठी बिल्डरला टीडीआर देण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

ही योजना SRA ची असली तरी, इथे झोपडपट्टी नाही. ही खाजगी जागेवरची SRA ची योजना आहे. विमानतळाच्या एवढ्या जवळ खाजगी जागेवर SRA योजना करण्याची गरज होती का, हवाई दलानं दिलेली पत्र का दाबून ठेवण्यात आली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतायत.