झी २४ तास वेब टीम, कोलकाता
इंडियाने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये आपली पहिली इनिंग ही ६३१ रन्सवर घोषित केली. सात विकेटच्या मोबदल्यात इंडियाने ६३१ रन्सची भरीव कामगिरी केली. यात लक्ष्मणने सर्वाधिक रन्स केले. लक्ष्मण १७६ रन्सवर नॉटआऊट राहीला.
उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पेश करत कॅप्टन कुल धोनीने सेच्युरींचा पल्ला गाठला. परंतु तो दीडशतक करण्यास मात्र चुकला. १४४ रन्सवर असताना धोनीची केमार रोचने विकेट घेतली. मात्र इंडियाला मजबूत स्थितीत नेण्यामध्ये धोनीचा मोलाचा वाटा होता. त्याने १७५ बॉलचा सामना केला. धोनीने कॅप्टन इनिंग खेळत, कॅप्टनला साजेसा खेळ करत आपली सेंच्युरी साजरी केली, त्याने १५१ बॉल्समध्ये त्याचा शतकाला गवसणी घातली. त्याने चौफेर फटकेबाजी केली त्यांच्या खेळीमध्ये त्याने ८ फोर आणि २ सिक्स मारले.
इंडियाचा दुसरा दिवस हा गाजवतो आहे तो व्हीव्हीएस लक्ष्मण, त्याने शैलीदार फलंदाजीचं अक्षरश: दर्शनच घडवलं, त्याने वेस्ट गोलंदाजीला गोंजारत गोंजारत सीमेपलीकडे धाडले आणि आपले दीडशतकी देखील साजरे केले. त्याने २४८ बॉल्समध्ये १५० केले. ज्यात १५ फोरचा समावेश होता. तर धोनी एका बाजूने धडाकेबाज फंलदाजी करत टीम इंडियाला भक्कम स्कोर उभा करत आहे. धोनीने फटकेबाजी करत १३६ बॉल्स मध्ये ८९ रन्स केले आहेत. त्यामुळे धोनी आपले शतक पूर्ण करतो का याकडेच साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन व्हीव्हीएस लक्ष्मणनं शानदार सेंच्युरी झळकावली. लक्ष्मणची टेस्ट करिअरमधील ही १७ वी सेंच्युरी ठरली आहे. तर त्याच्या आवडत्या ईडन्स गार्डन्स मैदानावरील ही ५ वी सेंच्युरी आहे. तर २०११ क्रिकेट सीझनमधील त्याची ही पहिलीच सेंच्युरी ठरली आहे. त्याच्या सेंच्युरीमुळेच टीम इंडियाला ४०० रन्सचा टप्पा पार करता कोलकाता टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या सेंकड सेशनमध्येही टीम इंडियाची धडाकेबाज बॅटिंग सुरुच आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या शानदार बॅटिंगसमोर विंडिज बॉलर्सचं काहीच चालल नाही. त्यांना या दोघांना आऊट करण्यात यश आलं नाही. या दोघांनी मिळून टीम इंडियाला ५४५ रन्सच टप्पा पार करुन दिला. धोनीनं तर आपल्या टेस्ट करिअरमधील 24 वी हाफ सेंच्युरीही झळकावली. आता सेंकड सेशनमध्ये भारतीय टीम मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणे आपलं वर्चस्व कायम राखलं. या सेशनमध्ये वेस्ट इंडिजला केवळ एकच विकेट घेण्यात यश आलं. युवराज सिंगला 25 रन्सवर आऊट करण्यात विडिज कॅप्टन डॅरेन सॅमीला यश आलं.