..जर बांग्लादेश हरलं तरच भारत फायनलमध्ये

एशिया कप अत्यंत रोमांचकारी वळणावर येऊन ठेपलं आहे. आज जर का श्रीलंकेने बांग्लादेशला हरवलं तरच भारत एशिया कपच्या फायनलमध्ये पोहचणार आहे. आणि जर का श्रीलंका ही मॅच हरल्यास भारताला मायदेशी परतावं लागणार आहे.

Updated: Mar 20, 2012, 03:00 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

एशिया कप अत्यंत रोमांचकारी वळणावर येऊन ठेपलं आहे. आज जर का श्रीलंकेने बांग्लादेशला हरवलं तरच भारत एशिया कपच्या फायनलमध्ये पोहचणार आहे. आणि जर का श्रीलंका ही मॅच हरल्यास भारताला मायदेशी परतावं लागणार आहे. तर पाकिस्तान मात्र याआधीच फायनलमध्ये पोहचली आहे.

 

भारताने पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेला हरवलं. पण शुक्रवारी सचिनच्या १०० व्या शतकानंतरही बांग्लादेशला हरवू शकलो नाही. आणि या सामन्यातील पराभवामुळे भारताच्या फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा धुसर केल्या. पण पाकिस्तानला धूळ चारीत भारताने आपल्या फायनलमध्ये खेळण्याची आशा टिकून ठेवल्या आहेत.

 

श्रीलंकेने जर बांग्लादेशला पराभूत केले तर भारत फायनलमध्ये जाणार आहे. पण श्रीलंकेचा पराभव झाल्यास तर भारताला ही त्याचा फटका बसणार आहे. अशा स्थितीत भारत आणि बांग्लादेश यांचे आठ - आठ पॉईंट होतील, पण बांग्लादेशने भारताला हरविले होते, आणि भारताचा नेट रन रेट चांगला असून देखील भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी पात्र ठरू शकणार नाही