www.24taas.com, मिरपूर
भारत-बांग्लादेश यांच्यात आज लढत होत आहे. आशिया चषकात सलग दुस-या विजयाची नोंद भारत करणार का याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टरचे महाशतक होणार का, याचीही उत्कंठा असणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल
बांग्लादेशला स्पर्धेतून बाहेर पाठवण्याचा डबल धमाका उडवण्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे. बांग्लादेशसमोर भारतीय संघाचे आज आव्हान असणार आहे. यजमान बांग्लादेशला घरच्या मैदानावर बलाढ्य भारताच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सलामी सामन्यातील पराभवामुळे बांग्लादेशचे स्पर्धेतील स्थान अडचणीत आले आहे. शुक्रवारी भारतविरुद्धच्या सामन्यात बांग्लादेशला विजयाची आवश्यकता आहे.
श्रीलंकेला नमवून पुरागमन करणारा भारतीय संघाचा फॉर्म कायम राहण्याची शक्यता आहे. श्रीलंकेपाठोपाठ बांग्लादेशला पराभवाची धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पुनरागमन करणाऱ्या इरफानने श्रीलेंकविरुद्ध घातक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध इरफानच्या धारदार गोलंदाजीचा फायदा घेण्यावर टीम इंडियाचा भर असणार आहे. तसेच त्याला साथ देण्यासाठी प्रवीण कुमार, आर.अश्विन ही जोडीदेखील प्रयत्नशील राहणार आहे.
फलंदाजीतही भारताचे पारडे जड आहे. सचिनसाठी शुक्रवारी होणारा सामना अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे. गौतम गंभीर, विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना व धोनी यांच्यावर फलंदाजीची मदार असणार आहे. तर गचाळ क्षेत्ररक्षण आणि सुमार गोलंदाजीचा मोठा फटका बांगलादेशला सलामी सामन्यात बसला होता. यामुळे या चुकांना सुधारून बांग्लादेशला भारताचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय संघ-
महेद्र सिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, गौतम गंभीर, मनोज तिवारी, सुरेश रैना, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, प्रवीण कुमार, इरफान पठाण, आर.अश्विन, अशोक डिंडा, युसूफ पठाण, राहुल शर्मा, विनय कुमार.
बांग्लादेश संघ-
मुशफिकीर रहीम (कर्णधार), अब्दुल रझाक, अनामुल हक, इलियास सनी, इमरुल कयेस, जहुरूल इस्लाम, महमुद्दल्लाह, मुर्तझा, नसीर हुसैन, शफीउल इस्लाम, शहादत हुसैन, शाकीब अल हसन, तमीम इकबाल.