www.24taas.com, मीरपूर
विराट कोहलीच्या भन्नाट खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताचा हा विजय ऐतिहासिक विजय आहे. आजवर धावांचा पाठलाग करताना भारताने मिळविलेला ही विजय सगळ्यात मोठा विजय आहे. यात विराट कोहलीचा वाटा हा देखील विराटच होता. त्याने फक्त १४८ बॉलमध्ये १८३ रनची तुफानी खेळी केली. त्यात तब्बल २२ फोर आणि १ सिक्सचा समावेश आहे. विराटचा ही आजवरची सर्वोच्च खेळी ठरली आहे. विराटने या वर्षाच्या सुरवातीलाच ३ शतकं केली आहेत. त्यामुळे विराट हा खऱ्या अर्थाने मॅचविनर ठरत आहे.
लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
पाकिस्तानचं ३३० रनचं आव्हान भारताने ४७.५ ओव्हरमध्येच पार केलं त्यामुळे भारताने ११ बॉल आणि ६ विकेटने हा सामना जिंकला आहे. भारताची सुरवात खराब झाली. गंभीर शून्यावर आऊट झाला त्यामुळे सचिन आणि कोहली यांनी मॅचची सूत्र आपल्याकडे घेतली आणि भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं मात्र सचिन आऊट झाल्यानंतर त्यासोबत आलेल्या रोहित शर्माच्या सोबत त्याने १७२ रनची भागीदारी रचली आणि भारतच्या विजयाचा मार्ग सोपा केला. सचिनने ५२, रोहित शर्माने महत्तवपूर्ण ६८ रनची खेळी केल्याने भारताला पाकिस्तानवर सहजपणे विजय मिळविता आला.
विराट कोहलीने पुन्हा एकदा आपणच ‘दी बेस्ट’ असल्याचे दाखवून दिलं आहे. सातत्य काय असतं याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणज विराट कोहली. विराटने पाकिस्तान विरूद्ध दमदार शतक ठोकलं आहे. त्यामुळे विराटचं हे वन-डे मधील ११वं शतकं आहे. तर एशिया कपमधील हे दुसरं शतक त्याने केले आहे. गंभीर झटपट आऊट झाल्यानंतर सचिनच्या साथीला आलेल्या विराटने खेळाची सुत्र आपल्याकडे घेतली आणि दणदणीत शतक देखील ठोकलं. निवडसमितीने विराटला उपकप्तान पद दिले.
विराटनेही निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवला. पण शतक झाले असले तरी त्याला भारताला मॅच जिंकून देणं महत्त्वाचं आहे. विराटने त्याचे शतक ९७ बॉलमध्ये पूर्ण केले. त्यात ११ फोरचा समावेश आहे. विराट कोहलीने सचिनसोबत भारताचा स्कोअरबोर्ड सतत हलता ठेवल्याने रनची गती त्यांना टिकवता आली.
भारताला दुसरा धक्का बसला आहे, सचिन तेंडुलकर ५२ रनवर आऊट झाला आहे. त्यामुळे भारताला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे आता पुन्हा टीमला एका चांगल्या भागिदारीची गरज आहे. रोहीत शर्मा हा विराट कोहली सोबत खेळत आहे. एशिया कपमधील इंडिया पाकिस्तान वन-डे मॅचमध्ये सचिन आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाला चांगली सुरवात करून दिली.
त्यामुळे टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. सचिन आणि विराट यांनी गंभीर आऊट झाल्यानंतरही स्वत:वर दबाव येऊन दिला नाही. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी बॉलरवर हल्ले चढवले आणि पाकिस्तानचे मनसुबे उधळले, सचिन आणि विराट कोहली यांनी आपआपली अर्धशतकं झळकावली आहेत. तर विराट कोहली हा देखील प्रचंड फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी अर्धशतक तर झळकावलेच. मात्र आता शतकाच्या दिशेने पुढे सरकतो आहे.
मीरपूर येथील एशिया कपमधील मॅचमध्ये पाकिस्तानने भारतासमोर आव्हान ठेवलं आहे. आज पुन्हा एकदा भारतीय बॉलर्सने साफ निराशा केली. भारतीय बॉलर पूर्णत: अयशस्वी ठरले. पहिली विकेट मिळविण्यासाठी भारताला जवळजवळ आठ बॉलर वापरावे लागले, त्यामुळे भारतीय गोलंदाजी अगदीच कमकुवत दिसून आली.
आणि त्यामुळेच पाकिस्तानला इतंकी मोठी झेप मारता आली. त्यामुळे आता भारतीय बॅट्समनना तगडं आव्हान आहे. आणि त्यामुळे ही मॅच जिकंण देखील महत्त्वाचं आहे. कारण की, त्यानंतरच ही भारत एशिया कपच्या फायनलमध्ये पोहचू शकेल.
भारत पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सुरु असलेल्या एशिया कपमधील वनडे मॅचमध्ये पाकिस्तानने प्रथम बॅटींग करून जबरदस्त सुरवात केली. त्यांचे ओपनर बॅट्समन हाफीज आणि नासिर यांनी तडाकेबाज शतकं ठोकली. भारताला पहिली विकेट मिळविण्यासाठी ३५ व्या ओव्हरची वाट पाहावी लागली..
त्यानंतर भारताने लगेचच आणखी दोन विकेट मिळविल्या. मात्र पाकिस्तानने तोवर चांगलीच झेप मारली हो