www.24taas.com, मोहाली
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आज मोहालीत मुंबईने हिसाब वसूल केला आहे. चुरशीच्या सामन्यात मुंबईने पंजाबचा ४ गडी आणि एक चेंडू राखून पराभव केला. १९ व्या षटकात अंबाती रायडू आणि रॉबिन पेटरसन यांनी तब्बल २७ धावा तडकावल्या.
मुंबई इंडियन्सला अखेरच्या दोन षटकात ३२ धावांची गरज होती. मात्र, पियुष चावला यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत अंबाती रायडू आणि पेटरसन यांनी तब्बल २७ धावा काढल्या (४, ४, ६, १, ६, ६)
त्यानंतर मुंबईला विजयासाठी एका षटकात पाच धावा हव्या होत्या. अनुभवी अझर मेहमूदने शानदार गोलंदाजी दाखवत सामना २ चेंडू २ धावा असा चुरशीचा करून ठेवला होता. मात्र, अझर मेहमूदच्या पाचव्या चेंडूवर अंबाती रायडूने चौकार लगावत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला.
यापूर्वी पंजाबकडून कर्णधार डेव्हिड हसी याने ४० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार लगावत ६८ धावा केल्यात. तर दक्षिण आफ्रिकन खेळाडू डेव्हिड मीलर याने १७ चेंडूत १ चौकर आणि ३ षटकार लगावून ३४ धावांची खेळी केली.
पंजाबने आपल्या डावात केवळ तीन गडी गमावले. मुंबईकडून आर. पी. सिंग, क्लेंट मेकाय, जेम्स फ्रँक्लिन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
किंग्ज इलेवन पंजाब संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्या साठी मैदानात उतरला.