सर्फराजने मोडला सचिनचा रेकॉर्ड

सर्फराज खान भारतीय क्रिकेटमधील अजून एक स्टार. या युवा प्लेअरनं शालेय क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी अविस्मऱणीय अशीच आहे. २००९मध्ये सर्फराज खानने हॅरिस शिल्डमध्ये खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढला.

Updated: Dec 16, 2011, 12:28 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

सर्फराज खान भारतीय क्रिकेटमधील अजून एक स्टार. या युवा प्लेअरनं शालेय क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी अविस्मऱणीय अशीच आहे. २००९मध्ये सर्फराज खानने हॅरिस शिल्डमध्ये खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडीत काढला. रिझवी स्प्रिंगफील्ड हाई स्कूलकडून खेळणाऱ्या सर्फराजने रन्सची मॅरेथॉन खेळी केली.

 

सर्फराजनं १२ सिक्स आणि ५६ फोरच्या जोरावर ४३९ रन्सची खेळी साकारली. हॅरिस शिल्डमध्ये सर्फराजच्या विक्रम मोडण्यापूर्वी या टूर्नामेंटमध्ये सचिनने ३४६ रन्स केल्या होत्या. हॅरिस शिल्डमध्ये सचिनने विनोद कांबळीबरोबर ७४८ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशिप केली होती. यामध्ये सचिनने या ३४६ रन्स केल्या होत्या. आता सर्फराजने ४३९ रन्सची इनिंग खेळली आहे.

 

सर्फराजने ही मॅराथॉन इनिंग खेळण्यासाठी जास्त वेळही घेतला नाही. त्याने ४५६ मिनिटांमध्ये ही शानदार इनिंग खेळली. त्याच्या या दमदार खेळीच्या जोरावरच त्याच्या टीमला ७५० रन्सचा विशाल स्कोअर उभा करण्यात यश आलं. सर्फराजच्या या दमदार खेळीने सचिनची त्या ऐतिहासिक इनिंगला पुन्हा उजाळा मिळीला. आता सर्फराजकडूनही सचिनसारख्याच यशाची अपेक्षा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत. म्हणूनच सर्फराजसमोर आता आव्हान आहे ते सचिन तेंडुलकरसारख यश मिळवण्याचं.