वेस्ट इंडिज फलंदाजांना धक्के

भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जोरदार धक्के दिले आहेत.

Updated: Dec 2, 2011, 11:37 AM IST

झी २४ तास वेब टीम, विशाखापट्टणम

 

वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा आज  दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत असून, भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना जोरदार धक्के दिले आहेत. वेस्ट इंडीजने  30 षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 144 धावा केल्या आहेत.

 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. येथील मैदानावरील तीनही सामने इंडियाने जिंकले आहेत. आजच्या सामन्यावर पावसाचे गडद ढग होते. परंतु पावसाचे सावट कमी झाल्याने सामना रंगला.

 

कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत, भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना एकामागून एक धक्के दिले. गोलंदाज उमेश यादवने तीन गडी बाद, तर विनय कुमारने दोन गडी बाद केले. विंडिजची पडझड सुरू असली तरी लेंडल सिमन्सने चिकाटी धरली आहे. तो 45 रन्सवर खेळत आहे. वेस्ट इंडिजची अवस्था पाच बाद 92 अशी झाली आहे. सिमन्सला साथ दिली आहे ती किरोन पोलार्डने. तो 8 रन्सवर खेळत आहे.