जळगाव : कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाप्रशानाने कडक पावले उचलले आहे. जळगावात सोमवारी 17 मे पासून 30 मे पर्यंत लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू असणार आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात संचारबंदीचे नियम लागू असतानाही काही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या काहीशी कमी होत असली तरीही, संभाव्य रुग्णवाढ नियंत्रणात आणून कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी कडक लॉकडाऊन जारी केला आहे.
जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. भाजी मंडईंची विभागणी करण्याचेही आदेश प्रशासनाने दिले आहेत. जळगाव शहरातील प्रत्येक वार्डात भाजी व फळे दुकानांची विभागणी करून सुरू ठेवण्यात येणार आहे.
लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही. यासाठी आधीच्या दिवशी कूपन वाटप होणार आहे. कूपन असलेल्या नागरिकांचेच लसीकरण होणार आहे.
लॉकडाऊन दरम्यान, फक्त वैद्यकीय कारणासाठीच घराबाहेर पडता येणार आहे. जिल्ह्यात दूध विक्री आणि दूध संकलन सुरू राहणार आहे. तसेच शेतीशी निगडीत कामे सुरू राहतील असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
----------------
जळगाव कोरोना अपडेट (16 मे)
--------------
राज्यात आज 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद
राज्यात आता कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 39 हजार 923 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 695 रूग्णांचं निधन झालं आहे. त्याचप्रमाणे 53 हजार 249 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 53 लाख 9 हजार 215 इतकी आहे. तर आतापर्यंत एकुण 79 हजार 552 रूणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.