2 हजारच्या नोटेचा परिणाम! तीन महिन्यात 500 च्या तब्बल 'इतक्या' नोटा छापण्याचं टार्गेट

Nashik Currency Note Press: तीन महिन्यात पाचशे रुपयांच्या 165 कोटी नोटा छापण्याचं टार्गेट नाशिक नोट प्रेसला देण्यात आले आहे. दोन हजाराच्या नोटबंदीमुळे 500 च्या नोटांची छपाई जलदगतीने सुरु आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 23, 2023, 10:24 AM IST
2 हजारच्या नोटेचा परिणाम! तीन महिन्यात 500 च्या तब्बल 'इतक्या' नोटा छापण्याचं टार्गेट title=

Nashik Currency Note Press : दोन हजाराच्या नोटा बंद केल्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नाशिक नोट प्रेसला तीन महिन्यात 500 रुपयांच्या 1975 दशलक्ष नोटा छापण्याचे टार्गेट दिले आहे. सध्या दोन हजारांच्या अंदाजे 1 हजार 833 दशलक्ष नोटा बाजारात आहेत आणि हे बघता पाचशेच्या जवळपास साडेसात हजार दशलक्ष नोटांची भविष्यात गरज भासणार आहे. त्यामुळे नाशिकसह देवास येथील प्रेसला तीनशे ते चारशे दशलक्ष 500 रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालगोनी प्रेसमध्ये उर्वरित छपाई सुरू आहे. 2000 च्या नोटांची छपाई  रिझर्व बँकेच्या महसूल आणि सालगुनी येथील नोट प्रेसमध्ये ही छपाई केली जात होती. ही छपाई 2018-19 या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात आली होती. दोन हजाराच्या नोटांची तूट भरून काढण्यासाठी पाचशेच्या नोटा छपाईची लगबग नाशिक सिक्युरिटी प्रेसमध्ये सुरु आहे.

19 मे 2023 रोजी 2 हजार रुपयांची नोटांची छपाई बंद करण्याचे आदेश RBI ने दिले.  केंद्र सरकारने दोन हजाराच्या नोटा बंद करतानाच नाशिक नोट प्रेसला तीन महिन्यात 1975 मिलियन नोटा छापण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दोन हजाराच्या नोटा बंद केल्यामुळे पाचशे रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे.

सध्या दोन हजारांच्या अंदाजे 1 हजार 833 मिलियन नोटा बाजारात आहे. हे पाहता पाचशेच्या जवळपास साडेसात हजार मिलियन नोटांची भविष्यात गरज भासणार आहे. त्यामुळे नाशिकसह देवासच्या प्रेस ला तीनशे ते चारशे मिलियन नोटा आणि रिझर्व्ह बँकेच्या म्हैसूर आणि सालगोनी प्रेसमध्ये उर्वरित छपाई सुरू आहे . 2000 च्या नोटांची छपाई रिझर्व बँकेच्या महसूल आणि सालगुनी येथील नोट प्रेस मध्ये ही छपाई केली जात होती. ही छपाई 2018 19 या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात आली होती. 

नोट बदलण्यासाठी 30 सप्टेंबरची डेडलाईन

मंगळवारपासून म्हणजेच 23 मे पासून देशातील सर्व बँकांमध्ये दोन हजारांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तेव्हा लोकांनी नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करु नये असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं केले आहे. नोट बदलण्यासाठी 30 सप्टेंबरची डेडलाईन आहे. मात्र, त्यानंतरही दोन हजारांची नोट वैध राहिल असं स्पष्टीकरण RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहे.
 30 सप्टेंबरपर्यंतच दोन हजाराच्या नोटा चलनात असणार आहेत.. 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत. एकावेळी जास्तीत जास्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदली करता येणार आहेत.