छोट्या पडद्यावरील 'बाळकृष्ण' आता अशी दिसते

Aug 23, 2019, 13:32 PM IST
1/7

टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये अनेक कलाकारांनी भगवान श्री कृष्णाची भूमिका साकारली आहे. पण त्यातील काही कलाकारांनी साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी छाप उमटवली. यापैकीच एक म्हणजे बालकलाकार धृती भाटिया. 

2/7

धृती भाटियाने 'जय श्री कृष्ण' या मालिकेत छोट्या श्री कृष्णाची भूमिका साकारली होती. धृतीने साकारलेली श्री कृष्णाची भूमिका आजही अनेकांच्या मनात कायम आहे. धृती तिच्या अभिनयामुळे चांगलीच चर्चेत होती.

3/7

धृतीच्या चेहऱ्यावरचे भाव आणि तिच्या निरागसपणामुळे तिने सर्वांनाच खिळवून ठेवलं होतं. 

4/7

ज्यावेळी धृती या मालिकेमध्ये भूमिका साकारत होती, त्यावेळी ती ३ वर्षांची होती. आता धृती १४ वर्षांची झाली आहे. 

5/7

'जय श्री कृष्ण' ही मालिका रामानंद सागर यांच्या श्री कृष्णा शोचा रिमेक होती. रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांनी या मालिकेची निर्मिती केली होती.

6/7

धृतीने कृष्णाच्या मालिकेनंतर अनेक इतर शोदेखील केले. माता की चौकी या शोमधूनही ती प्रसिद्धीझोतात आली.

7/7

सध्या धृती तिच्या अभ्यासावर लक्षकेंद्रीत करत आहे. धृतीच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फॅन पेज चालवले जातात.