close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लॅक्मे फॅशन शोमध्ये गर्लफ्रेंडसोबत फरहान अख्तरचा रॅम्पवॉक

Aug 22, 2019, 18:24 PM IST
1/6

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि गायक फरहान अख्तर गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. 

2/6

सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा रॅम्पवॉकमुळे बीटाउनमधील ही जोडी सर्वांचच लक्ष वेधतेय.

3/6

फरहान आणि शिबानीने लॅक्मे फॅशन वीक २०१९ मध्ये रॅम्पवॉक केला. फॅशन शोमधील दोघांचा हा पहिलाच रॅम्पवॉक होता.

4/6

या फॅशन शोसाठी फरहान आणि शिबानी, डिझायनर पायल सिंघलचे शो स्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरले. 

5/6

फॅशन शोमध्ये दोघांनी पायल सिंघलचं विंटर फॉल २०१९ कलेक्शन सादर केलं.

6/6

शिबानीने पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. त्यावर मॅचिंग चोळी आणि फ्रिलच्या श्रगसोबत टीमअप केलं होतं. फरहानने शिबानीला मॅचिंग मल्टीकलर एथनिक कुर्ता-पायजमा आणि त्यावर स्पोर्ट्स शूज असा स्टायलिश लूक केला होता.