Sara Ali Khan या secret इंस्टाग्राम हँडलवरुन यूजर्सवर ठेवते लक्ष, एका कृत्यामुळे शाळेतून होणार होती Suspend

Sara Ali Khan : PCOS मुळे सारा अली खानचं एकेकाळी 96 किलो वजन होतं. तेव्हा तिच्याकडे पाहून कोणालाही वाटलं नव्हतं की ती आज लीड अभिनेत्री म्हणून चाहत्यांच्या मनात घर करेल.   

Aug 12, 2023, 09:53 AM IST

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिच्या अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. PCOS मुळे सारा अली खानचं एकेकाळी 96 किलो वजन असल्यामुळे ती आजची फिटनेस पाहून प्रत्येक जण अवाक् होतो. ती तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. 

 

1/10

ती तिच्या अभिनयाने जशी चर्चेत असते तशीच ती तिच्या लव्ह अफेयर आणि पर्नसल लाइफमध्ये कायम चर्चेत असते. सारा अली खान तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2/10

शुभमन गिल या क्रिकेटपटूसोबत तिचं अफेयर सुरु असल्याचा अनेक बातम्या समोर आल्यात. तिही आजी शर्मीला टागोरसारखी एका क्रिकेटशी लग्न करणार अशी चर्चा सुरु झाली. शुभमन आणि सारा याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही अफवा उडली होती. 

3/10

अमृता सिंग आणि सैफ अली खानची मुलगी साराने आज तिची सर्वाची नवी ओळख निर्माण केली आहे. 2019 मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटाद्वा तिने करिअरची सुरुवात केली. आज ती एका चित्रपटासाठी निर्मात्यांकडून करोडो रुपये घेते. 

4/10

सारा अली खानच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. आज वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील असे किस्से ऐकूयात जे तुम्ही कधीच ऐकले नसतील. करोडो रुपये घेणारी सारा अली खान 1600 रुपयांसाठी आई अमृताशी भांडली होती. याबद्दल तिनेच एका शोमध्ये सांगितले होते. 

5/10

सारा अली खानला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती.ती शालेय नाटकांमध्ये मुख्य भूमिका करत होती. सारा सोशल मीडिया हँडलवर खूप सक्रिय असतं. असं म्हणतात की, ती एका गुप्त इंस्टाग्राम हँडलवरुन युजर्सवर लक्ष ठेवते. स्वतःबद्दल लोकांच्या प्रतिक्रियांवर ती लक्ष ठेवून असते. 

6/10

सारा अली खान लहानपणापासूनच खूप खोडकर होती. त्याच्या या खोडकरपणामुळे शाळेतून निलंबित करणार होते. ती लहानपणापासून वडील सैफ अली खानसोबत शूटिंगच्या ठिकाणी सोबत जात होती. 

7/10

सारा अली खानने तिचा पहिला चित्रपट दिवंगत सुशातन सिंग राजपूतसोबत केला होता. त्यावेळी त्यांच्या अफेयरच्या चर्चा समोर आल्या होत्या. तर दुसरीकडे ती जेव्हा कॉफी विथ करणमध्ये दिसली तेव्हा कार्तिक आर्यनला डेट करतेय का? असं यूजर्सने विचारलं होतं. 

8/10

 दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणातही साराचं नाव आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. त्यावेळी साराने स्वतःच्या ड्रग्ज सेवनाचा आरोपसह कोणत्याही ड्रग पेडलरला ओळखण्यास नकार दिला.

9/10

सारा अली खानचा अध्यात्माकडे कल दिसून येतो. सोशल मीडियावर ती देशभरातील अध्यात्मिक स्थळांना भेट देण्याचे व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते. 

10/10

करिना कपूर आणि तिचं नात्याबद्दलही अनेकांनी प्रश्न विचारलं असताना त्यांचं मैत्रीचं नात असून तिचं करिनाच्या दोन्ही मुलांशी जिव्हाळ्याचं नात असल्याचं कायम दिसून आलं आहे.