अजित पवार भरात भाषण करीत होते, अचानक जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आला अन्....

Ajit pawar in Pune | पुणे महानगरपालिकेची मुदत आज संपते आहे. नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उदघाटनाची लागबग काल दिवसभर पाहायला मिळाली. 

Updated: Mar 14, 2022, 09:03 AM IST
अजित पवार भरात भाषण करीत होते, अचानक जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आला अन्.... title=

पुणे : पुणे महानगरपालिकेची मुदत आज संपते आहे. नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उदघाटनाची लागबग काल दिवसभर पाहायला मिळाली. खराडी येथील ऑक्सिजन पार्कच्या भूमिजनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार सुनील टिंगरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी जवळच्या मशिदीमधून अजान सुरू झाली. 

पुणे शहरातील विकासकामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काल आले होते. त्यावेळी उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. भाषण सुरू असताना जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आल्याने अजित पवार यांनी भाषण थांबवले. त्यांच्या या कृतीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

सत्कारासाठी मोठा हार नको.

अजान पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अजित पवार यांनी भाषण सुरू केले. त्यावेळी त्यांनी पुण्यातील विविध विकासकामांबाबत भाष्य केले. पवार यांना कार्यकर्त्यांनी मोठा हार घातला त्यावेळी ते म्हटले की, 'मोठा हार मी कधी घातला नाही. एव्हडा मोठा हार नको. वायफात खर्च नको जिथं उपयोग होईल तिथं खर्च करा. असं म्हणत पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.