सागर आव्हाड, झी मिडीया, पुणे: एका धक्कादायक बातमीने पुणे पुन्हा हादरलं आहे. पुण्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. खराडीमध्ये एका महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना ताजी असताना एका पतीने आपल्या पत्नीला उंदीर मारण्याचं ओैषध पाण्यात प्यायला देऊन तिला मारण्याचा प्रयत्न केला. चारित्र्याचा संशयावरुन ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे.
चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीला पाजले उंदीर मारण्याचे औषध दिल्याचं समोर आलंय. उंदीर मारण्याचं औषध पाण्यात टाकून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न पतीने केला. या प्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी 23 वर्षीय महिलेने या संदर्भात फिर्याद दिलीये. हनुमंत अंकुश गिरी असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर सासू सरस्वती, सासरे अंकुश, दीर आदित्य (तिघे रा. सुलतानपूर, जि. बीड), नणंद सुजाता प्रल्हाद भारती, शिवाजी भारती (रा. वडवणी, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साक्षी हनुमंत गिरी (वय २३, रा. केसनंद, नगर रस्ता) हिने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षीचा पाच वर्षांपूर्वी हनुमंत याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ देखील केला. दरम्यान, साक्षीचा पती हनुमंत कामानिमित्त केसनंद परिसरात स्थायिक झाला होता. दरम्यान हनुमंत हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून त्याचे वाद देखील होती होते. याच रागातून आरोपी पतीने उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून साक्षीला देऊन तिचा खूनाचा प्रयत्न केल्याचे साक्षीने फिर्यादीत म्हटले आहे