मुंबई : रिझर्व बँकेकडून (RBI) निर्बंध घालण्यात आलेल्या पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी (shivajirao bhosale sahakari bank) बँकेतून ठेवीदारांना 5 लाखा पर्यंतच्या ठेवी काढता येणार आहेत. रिझर्व बँकेनं त्यासाठी आधीच मान्यता दिलेली आहे. संबंधित ठेवीदारांनं ठेवी परत मिळण्याबाबतचा अर्ज बँकेच्या शाखेत करणं आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता. बॅंक लिक्विडेशनमध्ये काढल्याचा आदेश देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने मे 2021 मध्ये हा आदेश दिला होता.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने केलेल्या आर्थिक अनियमिततेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याआधी गंभीर ताशेरे ओढले होते. तसेच दिवाळखोरीची कारवाई का करु नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच आर्थिक निर्बंध देखील घातले होते.
बँकेकडे किमान भांडवल देखील नव्हते. त्यामुळे आपल्या ठेवीदारांने पैसे देण्याच्या स्थितीतही बँक नव्हती. 1996 मध्ये बँकींग व्यवसायाचा परवाना दिला होता. जो गेल्या वर्षी रद्द करण्यात आला आहे.