PUNE | दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड; चालकांनाही बाहेर काढून मारहाण

सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे रात्री नऊच्या दारूच्या नशेत असलेल्या तीन अज्ञातांनी  येणारे जाणारी वाहने अडवत वाहनचालकांना मारहाण करत होते

Updated: Mar 19, 2022, 08:33 AM IST
PUNE | दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड; चालकांनाही बाहेर काढून मारहाण title=

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे रात्री नऊच्या दारूच्या नशेत असलेल्या तीन अज्ञातांनी  येणारे जाणारी वाहने अडवत वाहनचालकांना मारहाण करत होते. या तरुणांनी नशेत आठ-नऊ वाहनचालकांना मारहाण केल्याने धायरी फाट्यावर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. 

सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरातील रिक्षा थांब्याजवळ तीन तरुण दारूच्या नशेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून मारहाण करत होते. यामध्ये तरुणांनी काही दुचाकीस्वरांना अडवून मारहाण केली. त्यानंतर नांदेड फाट्याकडे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला अडवून रस्त्याच्या बाजूला पडलेल्या सिमेंट ब्लॉकने गाडीची तोडफोड केली व चालकाला गाडीच्या बाहेर काढत मारहाण केली. 

यावेळी घाबरलेल्या अवस्थेत चालकाने आपला जीव वाचवत धायारीच्या दिशेने निघून गेले.  त्यानंतर त्या तरुणांनी पुन्हा एका दुचाकी स्वाराला अडवून दुचाकीस्वाराच्या हेल्मेटने मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, संबंधित घटनेची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.