Most common lies men tell : आजच्या जगात असा व्यक्ती सापडणं फार कठीण आहे, जो कधी खोटं बोलला नसेल. लहान मूल असो किंवा मोठी व्यक्ती आजकाल अनेकजण खोटं बोलतात. मुळात खोटं बोलणं हे एक ह्यूमन नेचर असल्याचं मानलं जातं. अनेकदा एखाद्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खोट्याचा आधार घ्यावा लागतो. तर काही लोकं खोट्यावर खोटं बोलून समोरची परिस्थिती मारून नेतात.
मात्र अनेक मुलं अशी असतात जी, रिलेशनशिपमध्येही खोटं बोलतात. पार्टनरला खूश ठेवण्यासाठी अनेकदा ते खोट्याचा आधार घेतात. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या अशाच खोट्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या गर्लफ्रेंडशी किंवा पत्नीशी बोलतात.
जर पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला माहिती असेल की मुलगा सिगारेट ओढतो, तर अनेकदा मुलं याविषयावर खोटं बोलतात. रिलेशनशिपमध्ये मुली अनेकदा मुलांना धूम्रपान करण्यास नकार देतात. अशावेळी मुलं मी सिगारेट ओढत नाही किंवा मी सिगारेट ओढणं सोडलं असं खोटं बोलतात.
रिलेशनशिपमध्ये असणारे पुरुष किंवा मुलं सर्रासपणे हे खोटं बोलताना दिसतात. काही पुरुष एका नात्यामध्ये असताना देखील दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होतात. यावेळी पुरुष मी सिंगल आहे, असं इतर मुलींना खोटं सांगतात.
पार्टनरचं मन जिंकण्यासाठी मुलं अनेक खोटं बोलतात. त्यापैकी हे एक खोटं मुलं बोलताना दिसतात.
मी तुझ्याशिवाय एक शक क्षणही जगू शकत नाही असे डायलॉग तुम्ही सिनेमांमध्ये ऐकले असतील. मात्र अनेकदा मुलं देखील त्यांच्या प्रेयसीला हे वाक्य बोलून दाखवतात. पार्टनरचा विश्वास जिंकण्यासाठी किंवा तिचं मन दुखावू नये म्हणून मुलं या खोट्या वाक्याचा आधार घेतात.
सध्या लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवले जातात. अशावेळी एखादी मुलगी पसंत करताना मुलं यापूर्वी कधीही शारीरिक संबंध ठेवलं नसल्याचं सांगतात.
अनेकदा पुरुष पैशांसंबंधीही खोटं बोलतात. लग्नापूर्वी मुलीला इम्प्रेस करण्यासाठी आपल्याकडे खूप पैसा आहे, असं ते मुलींना सांगतात. इतंकच नाही तर विवाहित पुरुषही पैसे पत्नीला नसल्याचं सांगतात.
मुलांना आवडणारी एखादी मुलगी आपल्या आयुष्यात यावी, यासाठी मुलं या खोट्या वाक्याचा आधार घेतात. यावेळी ते मुलींना, तू पहिली अशी मुलगी आहेस, जिच्या प्रेमात मी पडलोय, असं सांगतात.
( Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. )