Girls Interesting Facts : आपल्या प्रत्येकाला काही ना काही सवयी असतात. अशामध्ये काही सवयी या चांगल्या असतात तर काही सवयी वाईटंही असू शकतात. अशातच मुलं आणि मुलींना काही वेगळ्या सवयी असल्याचं मानलं जातं. तर मुलींना अशा काही सवयी ( Interesting Facts ) असतात, ज्याबद्दल अनेकांना माहिती नसते. मात्र मुलांना या सवयींबाबत जाणून घेण्याची फार इच्छा असते. आज जाणून घेऊया मुलींमध्ये अशा कोणत्या सवयी असतात.
काही मुलींना लिपस्टिक प्रचंड आवडते. कुठे बाहेर जाताना मुली लिपस्टिक लावतात. अशावेळी संपूर्ण आयुष्यात सरासरीने एक मुलगी जवळपास 2-3 किलो लिपस्टिक खातात.
डोळे मिचकवण्याची सवय प्रत्येकाला असते. मात्र असं म्हटलं जातं की महिला अधिक डोळे मिचकवतात. पुरुषांच्या तुलनेत महिला 2 पटीने अधिकवेळा डोळे मिचकावतात.
आपल्या आवडत्या किंवा जवळच्या व्यक्तीला आपण मिठी मारतो. तर मुली अशा मुलांवर अधिक विश्वास ठेवणं पसंत करतात, जो कमीत कमी 15 सेकंदापर्यंत मिठी मारतो.
अनेकांचा चालताना हात रिकामी असलेलं आवडतं. मात्र मुलींच्या बाबतीत ही गोष्ट अगदी विरूद्ध आहे. हात रिकामी असणं मुलींना अजिबात आवडत नाही. कदाचित त्यामुळे मुली नेहमी आपल्या सोबत पर्स किंवा पुस्तकं सोबत घेऊन चालतात.
मुलं कितीवेळ दिवसातून आरशात पाहतात? असा प्रश्न कधी तुमच्या मनात आलाय का? मात्र मुलींच्या बाबतीत हा प्रश्न विचारला तर कोणीही सांगेल की, मुली अधिक वेळा आरशात पाहतात. एका संशोधनानुसार, एक मुलगी साधारण वर्षातून 120 तास स्वतःला आरशात पाहत असते.
शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मुलींच्या मनात नेमक्या काय गोष्टी सुरु असतात, याची कल्पना मुलांना नसते. मात्र सेक्स नंतर महिलांना थेट झोप येत नाही किंवा त्यांची झोपायची इच्छा होत नाही. यावेळी त्यांना आपल्या पार्टनरशी बोलावसं वाटतं असतं.
प्रेमाच्या बाबतीत मुलींची मुलींचे विचार संवेदनशील असतात. अनेकवेळा मुली, आपण सुंदर दिसतोय की नाही, या विचाराने चिंतीत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
मोठा आवाज कानावर पडला की, आपण आपले कान बंद करून घेतो. मात्र तुम्हाला माहितीये का, कान बंद करण्याच्या बाबतीत महिला आणि पुरुष यांची सवय वेगळी असते. मुली कानामध्ये बोट घालून कान बंद करतात, तर मुलं हात ठेऊन कान बंद करतात.
मुलींची अजून एक सवय असते ती म्हणजे, मुलींना तिच्या पार्टनरने डोळ्यात पाहून सर्व इच्छा पूर्ण कराव्यात असं वाटतं.