Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2024 हे वर्ष आहे. या वर्षात सर्व राशींवर शनिदेवाचा जास्त प्रभाव असणार आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार 2024 चा अंक 8 आहे आणि 8 या अंकाचा स्वामी ग्रह शनीदेव असल्याने त्याचा प्रभाव अख्या वर्षावर असणार आहे. 2024 हे वर्ष म्हणजे 24 म्हणजेच 24 Carat gold..या अर्थ 2024 हे वर्ष तुम्हाला सोन्यासारखं शुद्ध करणार. आज प्रत्येक जण आपल्या घरात सुख समृद्धी आणि वैभव वाढवं म्हणून अहोरात्र मेहनत करत असतं. करिअर असो किंवा व्यवसाय यात प्रगती आणि यशासाठी ते घाम गाळत असतात. पण अनेक वेळा कितीही मेहनत करुही हवं तसं यश मिळत नाही. अशात 2024 हे वर्ष तुमच्या करिअर आणि व्यवसायात यश आणि प्रगतीची उंच शिखर गाठण्याासाठी ज्योतिषी डॉ. जया मदन हिने उपाय सांगितलं आहे. (2024 is the year of Shani which will give you success and progress in career just do this Shani upay Astrology in marathi)
तुम्ही जेव्हा कामावर जाता, तुमचं दुकान आहे, व्यवसाय आहे किंवा ऑफिस आहे, एकंदरी कुठल्याही कामावर जेव्हा तुम्ही जातात. तुमच्या कामात कुठलेही अडथळे येऊन नये, समस्या येऊन नये म्हणून तुम्हाला दोन छोट्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही कार्यक्षेत्रात प्रवेश करता म्हणजे तुमच्या कर्मस्थानाचे स्वामी हे शनिदेव आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी कर्मस्थानात प्रवेश करताना म्हणजेच ऑफिसमध्ये एन्ट्री करताना तुमचा उजवा पाय ठेवण्यापूर्वी शनिदेवाचे 10 नावांचं स्मरण करा. शनिदेवाची जी नावं तुम्हाला सोपी वाटतात ती घेतली तरी चालणार आहेत. हे नाव घेताना श्वास थांबून ऑफिसमध्ये उजवा पाऊल ठेवून प्रवेश करायचा आहे, असं ज्योतिषी डॉ. जया मदन हिने यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
1. शनैश्चर
2. शांत
3. सर्वाभीष्टप्रदायिन्
4. शरण्य
5. वरेण्य
6. सर्वेश
7. सौम्य
8. सुरवन्द्य
9. सुरलोकविहारिण्
10. सुखासनोपविष्ट
11. सुन्दर
12. घन
13. घनरूप
14. घनाभरणधारिण्
15. घनसारविलेप
16. खद्योत
17. मंद
18. मंदचेष्ट
19. महनीयगुणात्मन्
20. मर्त्यपावनपद
21. महेश
22. छायापुत्र
23. शर्व
24. शततूणीरधारिण्
25. चरस्थिरस्वभाव
26. अचञ्चल
27. नीलवर्ण
28. नित्य
29. नीलाञ्जननिभ
30. नीलाम्बरविभूषण
31. निश्चल
32. वैद्य
33. विधिरूप
34. विरोधाधारभूमि
35. भेदास्पद स्वभाव
36. वज्रदेह
37. वैराग्यद
38. वीर
39. वीतरोगभय
40. विपत्परम्परेश
41. विश्ववंद्य
42. गृध्नवाह
43. गूढ़
44. कूर्मांग
45. कुरूपिण्
46. कुत्सित
47. गुणाढ्य
48. गोचर
49. अविद्यामूलनाश
50. विद्याविद्यास्वरूपिण्
51. आयुष्यकारण
52. आपदुद्धर्त्र
53. विष्णुभक्त
54. वशिन्
55. विविधागमवेदिन्
56. विधिस्तुत्य
57. वंद्य
58. विरुपाक्ष
59. वरिष्ठ
60. गरिष्ठ
61. वज्रांगकुशधर
62. वरदाभयहस्त
63. वामन
64. ज्येष्ठापत्नीसमेत
65. श्रेष्ठ
66. मितभाषिण्
67. कष्टौघनाशकर्त्र
68. पुष्टिद
69. स्तुत्य
70. स्तोत्रगम्य
71. भक्तिवश्य
72. भानु
73. भानुपुत्र
74. भव्य
75. पावन
76. धनुर्मण्डलसंस्था
77. धनदा
78. धनुष्मत्
79. तनुप्रकाशदेह
80. तामस
81. अशेषजनवंद्य-
82. विशेषफलदायिन्
83. वशीकृतजनेश
84. पशूनांपति
85. खेचर
86. घननीलांबर
87. काठिन्यमानस
88. आर्यगणस्तुत्य
89. नीलच्छत्र
90. नित्य
91. निर्गुण
92. गुणात्मन्
93. निंद्य
94. वंदनीय
95. धीर
96. दिव्यदेह
97. दीनार्तिहरण
98. दैन्यनाशकराय
99. आर्यजनगण्य
100. क्रूर
101. क्रूरचेष्ट
102. कामक्रोधकर
103. कलत्रपुत्रशत्रुत्वकारण
104. परिपोषितभक्त
105. परभीतिहर
106. भक्तसंघमनोऽभीष्टफलद
107. निरामय
108. शनि
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)