April Graha Gochar 2023 : 'या' राशी एप्रिल महिन्यात ठरतील भाग्यशाली? गुरु - सूर्य - शुक्र गोचरमुळे येणार अच्छे दिन

April 2023 Lucky Zodiac Signs : नवीन वर्ष सुरु झालं आणि म्हणता म्हणता मार्च महिना संपला. एप्रिल महिन्याला सुरुवात झाली. ग्रह गोचरच्या दृष्टीने एप्रिल महिना खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यात गुरु, सूर्य आणि शुक्र गोचर होणार आहे. त्यामुळे या महिन्यात कोणाचं भाग्य उजळणार जाणून घ्या.

Updated: Apr 1, 2023, 07:44 AM IST
April Graha Gochar 2023 : 'या' राशी एप्रिल महिन्यात ठरतील भाग्यशाली? गुरु - सूर्य - शुक्र गोचरमुळे येणार अच्छे दिन title=
April Graha Gochar 2023 Shukra Gochar Surya Gochar guru shukra budh surya gochar Lucky Zodiac Signs in marathi

April Graha Gochar 2023 Lucky Zodiac Signs in marathi : प्रत्येक महिन्यात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशी शिवाय नक्षत्र परिवर्तन करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रह गोचरचा मानवी आयुष्यावर परिणाम होतो. काही राशींसाठी हे ग्रह गोचर शुभ ठरतं तर काही राशींसाठी तो संकट घेऊन येतो. एप्रिल महिन्यात ग्रह गोचरसाठी अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे, असं ज्योतिष अभ्यासकांनी सांगितलं आहे. 

एप्रिल महिन्यात सूर्य, गुरु, शुक्र ग्रह गोचर होणार आहे. या गोचरांसह काही अत्यंत शुभ आणि लाभदायक महायोग, राजयोग तयार होणार आहेत. काही राशींचं नशीब अगदी सूर्याप्रमाणे चमकणार आहे, असं ज्योतिष अभ्यास म्हणतात. या भाग्यवान राशी कोणत्या आणि एप्रिल महिन्यात कोणत्या ग्रहांचं गोचर होणार चला तर मग जाणून घेऊयात...(April Graha Gochar 2023 Shukra Gochar Surya Gochar  guru shukra budh surya gochar Lucky Zodiac Signs in marathi)

शुक्र गोचर 2023 (Shukra Gochar 2023)

एप्रिल महिन्यात सर्वात आधी शुक्र गोचर होणार आहे. शुक्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. 6 एप्रिल 2023 ला सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र वृषभ राशीत 2 मे पर्यंत विराजमान असणार आहे. 

सूर्य गोचर 2023 (Sun Transit 2023)

एप्रिल महिन्यात दुसरं महत्त्वाचं गोचर होणार आहे ते म्हणजे सूर्य गोचर (Surya Gochar 2023). 14 एप्रिल 2023 ला दुपार 3 वाजून 12 मिनिटांनी सूर्यदेव मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य देव 15 मे पर्यंत मेष राशीत विराजमान राहणार आहे. 

गुरु गोचर 2023 (Jupiter Transit 2023)

या महिन्यात तिसरा गोचर आहे गुरु गोचर (Guru Gochar 2023) ज्योतिष अभ्यासकांनुसार, गुरु 22 एप्रिल 2023 ला म्हणजे शनिवारी सकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर गुरु 1 मे पर्यंत मेष राशीत स्थिर राहणार आहे. 

एप्रिल महिन्यात 'या' ग्रहांची युती

ग्रह गोचरशिवाय एप्रिल महिन्यात मेष राशीत गुरु, राहू, सूर्य, बुध यांची युती होणार आहे. या युतीतून गुरूचा राजयोग आणि चतुर्ग्रह योग तयार होतं आहे. या योगामुळे अनेक राशींचं नशीब पालटणार आहे. 

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात जरा शांततेने घ्यावे. कुठलेही धाडसी निर्णय घेऊन नका. कुठलीही मोठी जोखीम अंगावर उगाचच ओढवून घेऊ नका. कौटुंबात संमिश्र वातावरण असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. एप्रिल महिन्यात या राशीच्या लोकांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. शांत मनाने आणि डोक्याने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी चांगले ठरतील. 

मिथुन (Gemini)

मेष राशीत 22 एप्रिलला गुरु  प्रवेश करणार आहे. त्यामुळे गुरुसह राहू, हर्षल आणि रवीचं भ्रमण असणार आहे. या ग्रह गोचरमुळे तुमच्या राशीवर परिणाम दिसून येणार आहे. वैचारिक गोंधळ होण्याची शक्यता असल्याचं ज्योतिष अभ्यास म्हणतात. नोकरी व्यवसायात शांततेने आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कसून तयारी करावी.विवाह इच्छुक उमेदवाऱ्यांनी 21 एप्रिलनंतर जोडीदाराचा शोध करावा. तुम्हाला हवा तसा जोडीदार मिळू शकतो. 

कर्क (Cancer)

या राशीला शुक्र गोचर धनलाभ करुन देणार आहे.  या काळात या राशीच्या लोकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांचा मेहनतीचं योग्य फळं मिळणार आहे. मात्र जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यांची मनस्थिती समजून घ्यावी. 21 एप्रिलला गुरू  मेष राशीत प्रवेश त्यामुळे महत्वाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)