सुर्यास्ताच्या वेळी चुकूनही करू नका 'या' गोष्टी नाहीतर देवी लक्ष्मी होईल नाराज

एखाद्या व्यक्तीने या गोष्टी केल्या तर त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

Updated: Nov 21, 2022, 11:25 AM IST
सुर्यास्ताच्या वेळी चुकूनही करू नका 'या' गोष्टी नाहीतर देवी लक्ष्मी होईल नाराज  title=

Astro Tips: आपल्या घरात देवी लक्ष्मी माता प्रसन्न राहावी म्हणून आपण चांगले उपाय करण्याचा प्रयत्न (Laxmi Devi) करत असतो. आपल्याला कायमच असं वाटतं असतं की देवी लक्ष्मीनं आपल्या घरावर आणि घरातल्या कुंटुंबावर (Godness Laxmi) आपली कृपा ठेवावी. तेव्हा असे काही उपाय शोधण्यासाठी आपण कायम तत्पर असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा राखण्यासाठी काही नियमित नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर माता लक्ष्मी रागावून घराबाहेर पडते. वास्तुशास्त्रातही (Vastushastra) अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतरही (Sunsrt) काही काम करण्यास मनाई आहे. घरातील वडीलधारी मंडळी सूर्यास्तानंतर काही काम करण्यास नकार देताना अनेकवेळा पाहिल्या असतील. हा काही गोष्टी जर तुम्ही वेळीच थांबवल्या तर माता लक्ष्मीची (Laxmi's Blessings) तुमच्यावर कायमच कृपा राहील. शास्त्रात सूर्यास्तानंतर असे काम करणे अशुभ मानले गेले आहे. तरीही एखाद्या व्यक्तीने 'या' गोष्टी केल्या तर त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असं वास्तू तज्ञ सांगतात. (astro tips do not follow this things after sunset maa laxmi do not like it)

सूर्यास्तानंतर कधीही झोपू नका

वास्तुशास्त्रानुसार, जर एखादी व्यक्ती संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतरही झोपली तर ती काही आजारांचा शिकार होऊ शकतो. यासोबतच असंही म्हटलं जातं की संध्याकाळी झोपणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य कमी होतं. सूर्यास्त म्हणजे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. अशा वेळी जर झोप लागली तर घराचे दरवाजे बंद पाहून माँ लक्ष्मी घराबाहेरूनच निघून जाते. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

घरात संध्याकाळी झाडू मारणे टाळा

हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तसेच सूर्यास्तानंतर झाडू मारण्यासही मनाई आहे. असे मानले जाते की संध्याकाळी घरात झाडू मारल्याने अशुद्धी घरात प्रवेश करतात आणि आई लक्ष्मी रागावते. यासोबतच असे मानले जाते की संध्याकाळी झाडू मारल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. वास्तु नियमांनुसार सूर्यास्तानंतर चुकूनही काही वस्तू दान करू नका. सूर्यास्तानंतर दही, दूध, मीठ इत्यादी कोणत्याही गरजू किंवा गरीब व्यक्तीला देऊ नये असे केल्याने घरात गरीबी येते असे म्हणतात तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा (Financial Crisis) सामना करावा लागतो. 

तुळशीची पूजा करू नये

हिंदू धर्मात तुळशीपूजेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. तुळशीची नित्य पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. अशा स्थितीत सूर्यास्तानंतर तुळशीच्या (Tulsi) रोपाला स्पर्श केल्यास किंवा पूजा केल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो, असे करणे अशुभ मानले जाते. अशा स्थितीत व्यक्तीला लक्ष्मी देवीच्या नाराजीला सामोरे जावे लागते.  

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)