मांजरीची ही एक गोष्ट घरात ठेवल्यास रातोरात व्हाल श्रीमंत?

घरात मांजर असेल तर तिची ही गोष्ट घरात ठेवा जपून!

Bollywood Life | Updated: Sep 27, 2022, 10:41 PM IST
मांजरीची ही एक गोष्ट घरात ठेवल्यास रातोरात व्हाल श्रीमंत? title=

Money Tips For Maa Lakshmi : हिंदू धर्मात लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीच्या कृपेनं घरात सुख-समृद्धी नांदते. लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त रात्रंदिवस उपासना करतात, उपवास करून लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करतात, उपाय इ. अशा वेळी ज्योतिष शास्त्रात असं काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते. दुःख कमी होऊन आर्थिक स्थिती उत्तम राहते. 

ज्योतिषशास्त्रात मांजरीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. ज्योतिष शास्त्रामध्ये मांजरीशी संबंधित अनेक शगुन देखील सांगण्यात आले आहेत. मांजरीचे दर्शन होणे, मांजरीचे येणे शुभ मानले जाते.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मांजरीची एक गोष्ट लक्ष्मीच्या श्री यंत्रापेक्षा कमी नाही. अशा स्थितीत तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यास व्यक्ती रातोरात श्रीमंत होऊ शकतो.

ज्योतिष शास्त्रात मांजरीची जार ही शुभ मानली जाते. (जार म्हणजेच मांजर ज्यावेली पिल्लांना जन्म त्यावेळी जार पडते) मांजरीची जार सापडली तर सर्वप्रथम त्यावर हळदीची पेस्ट लावा. ती घरात ठेवल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणाता धनप्राप्ती होण्याची शक्यता असते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीचे भाग्य चांगले असते त्यालाच मांजरीची नाळ मिळते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.