राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचा दिवस (Daily Horoscope) कसा जाईल, ते पाहा.

Updated: Dec 23, 2020, 06:58 AM IST
राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा जाईल? title=

मेष -
आजचा दिवस चांगला आहे. आपला आत्मविश्वास वाढले. आर्थिक उलाढाली होतील. तुमचा स्वभाव चंचल आणि उतावीळ असल्यामुळे स्वतःचे नुकसान  करुन घेवू नका.  एकादा निर्णय घेताना विचार करा आणि नंतर घ्या.

वृषभ -
आजचा दिवस आपल्या कामासाठी अनकुल आहे. नव्याने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला भविष्यात लाभ होवू शकतो.

मिथुन-
 आज आपण कुटुंबाला प्राधान्य द्याल. आपण आज खरेदी कराल. तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. थोडीशी काळजी घ्या. आजचा दिवस चांगला जाईल.

कर्क-
आज एखादा महत्वाचा निर्णय घ्याल. या निर्णयांचा फायदा आपल्याला फायदा होईल. गोड बोलण्यामुळे सामाजिक कार्यात आपल्याला महत्वाचे स्थान प्राप्त होईल. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. त्याचा विचार करण्यास हरकत नाही.

सिंह-
नोकरी-व्यवसायात जादा कामाची जबाबदारी घ्यावी लागेल. आज आपल्याला आपल्या हाताखालील लोकांकडून महत्वाची कामे करुन घ्याल. 

कन्या-
आज दिवस आपल्यासाठी लकी नाही.  महत्वाची कामे करणे आज शक्यतो टाळावीत. नोकरीत एखादी सवलत हवी असल्यास ती मिळण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. 

तूळ-
भागिदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे.  नोकरीतील आपल्या चांगल्याकामामुळे वरिष्ठ खूष होऊन एखादी सवलत देतील. वैवाहिक सौख्य लाभेल.  

वृश्चिक-
 नोकरी-व्यवसायात कामाचा ताण जाणवेल, दगदग होईल. परंतु आज केलेल्या कामाचा आपल्याला भविष्यात निश्चितफायदा होईल. आजचा दिवस भविष्याचा पायाभरणीसाठी चांगला आहे. 

धनू-
आजचा दिवसा आपल्यासाठी चांगला आहे. व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.  शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. 

मकर-
आज कौटुंबीक वातावरण चांगले राहिले. घरी पाहुणे मंडळी येण्याची शक्यता आहे.  शैक्षणिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे.  

कुंभ-
मित्र-मैत्रिणांच्या गाठीभेटी होतील. त्यामुळे आजचा दिवस चांगला जाईल.  कामानिमित्त छोटे प्रवास करावे लागतील. नोकरीत बढती-बदलीचे योग संभवतात. 

मीन-
 आजचा दिवस चांगला आहे. आधी केलेल्या कामांचा निश्चित लाभ होईल. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे.  संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणताही निर्णय घेवू नये. कोणताही व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्या.