राशीभविष्य | 'या' ४ राशींच्या व्यक्तींना व्यवसायात होऊ शकतो फायदा

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Oct 9, 2020, 07:22 AM IST
राशीभविष्य | 'या' ४ राशींच्या व्यक्तींना व्यवसायात होऊ शकतो फायदा  title=

मेष -  वायफळ खर्च करु नका. मोठ्या गोष्टी करु नका. अधिक धावपळ होईल. एखादी जवळची व्यक्ती तुमचा चुकीचा फायदा घेऊ शकते. तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. अॅलर्जी किंवा सांधेदुखी होऊ शकते. गुंतवणूक करताना सावध राहा. धनहानी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ - पैशांच्या बाबतीत मोठा निर्णय स्वत: घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या मनातील गोष्टी योग्यप्रकारे मांडता येणार नाहीत. तब्येत ठीक राहील. व्यवसायात वाद होऊ शकतो. मेहनत वाढेल. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे दु:खी होऊ शकता. काही कामात वेळ लागू शकतो. 

मिथुन - नोकरदारवर्गाला नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. अनेक कामात नशीबाची साथ मिळेल. व्यवसायात रखडलेले पैसे मिळू शकतात. एखाद्या गोष्टीबाबत मानत संभ्रम राहील. पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. प्रवास होऊ शकतो.  

कर्क - देण्या-घेण्यात सावध राहा. तुमच्या मेहनतीवर असंतृष्ट राहाल. अनेक लोक तुमच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करु शकतात. अनेक प्रकारच्या सूचना मिळू शकतात. अंगदुखी, डोकेदुखी होऊ शकते. एकाच वेळी अनेक कामं हाती घेऊ नका. समस्या येऊ शकतात. कामात मन लागणार नाही किंवा अडथळे येऊ शकतात. 

सिंह - व्यवसायिकांसाठी दिवस फायद्याचा आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांना विवाह प्रस्ताव येऊ शकतात. दिवस चांगला आहे. विद्यार्थांना मेहनत घ्यावी लागेल. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे चेकअप वेळेत करा. हवामान बदलामुळे त्रास होऊ शकतो. 

कन्या - कोणतंही जोखमीचं काम करु नका. वाद होण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टींमुळे समस्या वाढू शकतात. बोलण्याआधी विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे वाद होऊ शकतो. अधिक कामामुळे थकवा जाणवेल. घाईत कोणतंही काम करु नका. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. तब्येतीत सुधारणा होईल. 

तुळ - आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन सुखकारक राहील. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित मदत मिळेल. गरजा पूर्ण होतील. तब्येतीची काळजी घ्या. 

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. व्यवसायात कामं अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. कोणंतंही महत्त्वाचं पाऊल उचलण्याआधी विचार करा. दुसऱ्यासोबत तणावपूर्ण संबंध राहतील. ऑफिस किंवा व्यवसायात काही जबाबदारी येऊ शकते. 

धनु - नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. बढतीची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादे नवीन काम मिळू शकते, त्यात यशस्वी व्हाल. बिघडलेली स्थिती सुधारण्यात यश मिळेल. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. प्रेमसंबंधांसाठी दिवस ठीक आहे.

मकर - कुटुंबातील व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करु शकता. कोणत्याही गोष्टीला अधिक ताणू नका. तब्येत ठीक राहील. व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थांना मेहनत केल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होईल. 

कुंभ - जोडीदारासोबत फिरायला जायची योजना आखू शकता. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येत ठीक राहील. डोकेदुखी होऊ शकते. मतभेद होण्याची शक्यता आहे. शांत आणि सहनशील राहाल तर फायदा होईल.  व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. गुंतवणूकीत फायदा होईल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल.  

मीन - नोकरी आणि व्यवसायातील कामं पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. रखडलेले पैसे मिळू शकतील. अचानक येणाऱ्या समस्यांचा सामना कराल. यश मिळेल. कामात घाई करु नका. काही गोष्टींबाबत मनात चिंता राहील.  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवस शुभ आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नशिबाची साथ मिळेल.