Astrology : शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग करणार मालामाल; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ

Astrology :  ग्रहांच्या संयोगाने तयार होणारा शुभ आणि अशुभ योग येतात. या संयोगाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. 20 जुलै रोजी सकाळी 10.55 च्या शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग सिंह राशीमध्ये झाला आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jul 22, 2023, 12:59 PM IST
Astrology : शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग करणार मालामाल; ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ title=

Astrology :  वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली स्थिती बदलतो. कधी दोन ग्रह तर कधी तीन ग्रह एकाच राशीत एकत्र येतात. ग्रहांच्या संयोगाने तयार होणारा शुभ आणि अशुभ योग येतात. या संयोगाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. येत्या काळात शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग होणार आहे. 

20 जुलै रोजी सकाळी 10.55 च्या शुक्र, चंद्र आणि मंगळ यांचा संयोग सिंह राशीमध्ये झाला आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ही युती खूप महत्त्वाची आहे. या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगले फायदे मिळू शकणार आहेत. यावेळी कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळणार आहेत ते पाहूया. 

मेष रास

शुक्र, चंद्र आणि मंगळ यांच्या संयोगाचा या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. या काळात तुम्ही कर्जातून बाहेर पडू शकणार आहात. तुमच्याकडे अचानक संपत्ती येणार आहे. या काळाता मोठा नफा होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. तसंच तुम्हाला नवी नोकरी देखील मिळू शकते. करिअरमध्ये नवीन शिखरे येतील.

मिथुन रास

शुक्र, चंद्र आणि मंगळ यांच्या संयोगाचा या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायासाठी हा शुभ योग बनला आहे. या काळात लाभ होईल आणि मालमत्तेची खरेदी होईल. कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळेल. कुटुंबामध्ये एखादं मंगलकार्य घडणार आहे. 

सिंह रास

हा त्रिग्रही योग नोकरदार लोकांना विशेष लाभ देणार आहे. या काळात तुम्हाला पदोन्नतीची संधी आहे. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी मनाजोग्या गोष्टी घडणार आहेत. परीक्षेत विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली राहील.

तूळ रास

या त्रिग्रही  या राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ मिळणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत, आपण कोणतीही मालमत्ता इत्यादी विकून पैसे कमवू शकता. इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )