Navratri 2023 Shubh Sanyog And Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीला ग्रह आणि तारे यांचा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. आजपासून 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे. नवरात्रीतील नऊ दिवस अतिशय खास आहेत. कन्या राशीत सूर्य आणि बुध यांच्या युतीतून बुधादित्य योग आहे. त्याशिवाय शश राजयोगही तयार होतो आहे. 30 वर्षांनंतर, शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत राहील आणि बुध देखील स्वतःच्या राशीत राहून भद्रा योग होणार आहे. चंद्र गोचरमुळे मंगळ आणि केतु ग्रह तूळ राशीत आहे. या दोन ग्रहांमुळे आज अंगारक योग, ग्रहण योग आणि मंगळ आणि चंद्राची युतीतून लक्ष्मी योग आहे. या योगामुळे देवी माता काही राशींवर धनवर्षाव करणार आहे. (Bhadra Yoga Budhaditya Rajyoga and Shasha Rajyoga in Navratri 2023 this zodiac sign will get huge amount of money horoscope)
या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना माता दुर्गेच्या कृपेने घर आणि वाहनाचे सुख लाभणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होणार आहे. चांगली नोकरीची ऑफर तुम्हाला येणार आहे. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभासह प्रगतीची संधी मिळणार आहे. कौटुंबिक नात्यात गोडवा निर्माण होणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांना नवरात्रीच्या काळात माता दुर्गेची कृपा आणि बुधादित्य योगाच्या प्रभावामुळे छप्पडफाड पैशांची बरसात होणार आहे. करिअरमध्ये तुमची प्रगती होणार असून अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करणार आहेत. ऑफिसमध्ये तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. या महिन्यात तुम्हाला मुलाच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. कुटुंबातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि आनंदी असणार आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्यात बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. माता दुर्गा तुमच्यावर कृपाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. समाजात तुमचा मान-सन्मान द्विगुणीत वाढणार आहे. मित्रांच्या मदतीने तुमची अनेक प्रलंबित कामं सहज मार्गी लागणार आहे. चांगली नोकरीची ऑफर तुम्हाला येणार आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना यावेळी त्यांच्या कामात यश मिळणार आहे.
या महिन्यात बुधादित्य राजयोग तयार झाल्यामुळे तूळ राशीचे लोक अचानक श्रीमंत होणार आहेत. तुम्हाला यश मिळण्याची अनेक संधी लाभणार आहे. नवरात्रीमध्ये माँ दुर्गेसाठी उपवास केल्याने तुम्हाला अपेक्षित फळ लाभणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीशी फायदा होणार आहे. सोने खरेदी करण्याची संधी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.
या महिन्यात बुधादित्य योगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. नवरात्रीच्या काळात तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार असून नफा दुपटीने वाढणार होणार आहे. तुमच्या घरात भौतिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याचे योग निर्माण झाले आहेत.
Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.