Navratri 2023 : शारदीय नवरात्रीत घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त, जाणून शास्त्रशुद्ध पूजा विधी; पाहा Video

Navratri 2023 : गणपतीनंतर हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवाला अतिशय महत्त्व आहे. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त आहे. तर जाणून घ्या मुहूर्त, घटस्थापनेची शास्त्रशुद्ध पूजा विधी जाणून घ्या संपूर्ण माहिती...

नेहा चौधरी | Updated: Oct 14, 2023, 07:55 PM IST
Navratri 2023 : शारदीय नवरात्रीत घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त, जाणून शास्त्रशुद्ध पूजा विधी; पाहा Video title=
navratri ghatasthapana muhurat 2023 durga pujan vidhi puja sahitya ghatasthapana in the scientific way video

Navratri 2023 : शारदीय नवरात्रीला देशभरात खूप महत्त्व आहे. सूर्यग्रहणानंतर 15 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा  (Navratri 2023 Start Date) सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्रात घटस्थापना होते, तर गुजरात, बंगालमध्ये देवीचं आगमन होतं. पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. तर आज शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहे. 

देवीने नऊ दिवस दैत्यांशी युद्ध करुन नव्या दिवशी महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे नवरात्रीत नऊ दिवस देवी शक्तीच्या रुपाची पूजा केली आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री देवी रुपाची पूजा केली जाते. 

नवरात्री काळात देशभरातील देवी मंदिरात भाविकांची गर्दी होते. साडेतीन शक्तिपीठेपैकी महाराष्ट्रातील माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तश्रृंगी मंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. 

शारदीय नवरात्रीची तिथी

प्रतिपदा तिथी 14 सप्टेंबर 2023 शनिवारी रात्री 11:24 वाजेपासून सुरु होणार असून 15 ऑक्टोबर रविवारी दुपारी 12:32 वाजेपर्यंत असणार आहे. 

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

घटस्थापना मुहूर्त हा 15 ऑक्टोबरला सकाळी 11.44 ते दुपारी 12.46 पर्यंत असणार आहे.  घटस्थापनेसाठी सर्वोत्तम शुभ मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:46 पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करणे अत्यंत शुभ राहील.

घटस्थापनेसाठी साहित्य

चौरंग किंवा पाट, लाल वस्त्र, चंदन , दुर्वा , सुपारी , नाणे , फुलं , अक्षता, श्रीफळ, माती, पितळेचा तांब्या, सप्तमृतिका, सर्वोषधी, मध, कुंकू, दीप, गंगाजल, नाणी, श्रीदुर्गा देवीची सुंदर मूर्ती किंवा फोटो, कुंकू, केसर, कापूर, धूप, वस्त्र, आरसा, कंगवा, बांगड्या, सुगंधित तेल, तोरण, आंब्याचे डहाळे, कुंकवाचा करंडा, हळकुंड आणि नुसती हळद, आसन, दीपक, दीपबत्ती, नैवेद्य, मध, साखर, पंचमेवा, जायफळ, विड्याची पाने, लवंग, वेलची, घट मातीचा किंवा पितळेचा, हवन साहित्य

सात प्रकारचे धान्य

तीळ
तांदूळ
मूग
राळं 
जव 
हरभरा 
गहू

हेसुद्धा वाचा - Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षात पहिल्यांदाच असा योगायोग! नवरात्रीच्या 9 दिवसात 9 शुभ योग

घटस्थापना पूजा विधी (Ghatasthapana 2023 Puja Vidhi)

1. सर्वप्रथम मातीचे भांडे घ्या. त्यात तीन थरांमध्ये माती घाला आणि 9 प्रकारचे धान्य मातीत टाका आणि त्यात थोडं पाणी घाला.
2. आता एक कलश घ्या. त्यावर स्वस्तिक बनवा. मग मौली किंवा कलावा बांधून ठेवा. यानंतर कलश गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरा.
3. त्यात एक पूर्ण सुपारी, फुलं आणि दुर्वा घाला. तसंच अत्तर, पंचरत्न आणि नाणे देखील टाका.
4. कलशाच्या आत आंब्याची पानं लावा. कलशच्या झाकणावर तांदूळ ठेवा.
5. देवीचं स्मरण करताना कलशाचं झाकण लावा. आता एक नारळ घ्या आणि त्यावर कलवा बांधा. कलशवर स्वस्तिक चिन्ह बनवा.
6. कुंकवाने नारळावर टिळक लावा आणि नारळ कलशावर ठेवा.
7. कलशावर नारळासोबत तुम्ही काही फुलेही ठेवू शकता.
8. दुर्गा देवीच्या स्वागतासाठी हा कलश मंदिरात स्थापन करा.
9. दिवा लावा आणि त्याची पूजा करा. 
10. पहिल्या दिवशी विडाच्या पानाची माळ अर्पण करतात. 

कलश मंत्र 

कलशस्य मुखे विष्णु: कण्ठे रुद्र: समाश्रित:|
मूले त्वस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा: स्मृता:|

कलश मंत्राचा अर्थ 

कलशाच्या मुखात श्रीविष्णू, रुद्र कंठात ब्रह्मा आणि कलशाच्या मध्यभागी सर्व मातृशक्ती वास करतात. 

का केली जाते घटस्थापना?

1. नवरात्रीमध्ये लावलेला कलश नकारात्मक ऊर्जा दूर करु घरात शांतता नांदते.
2. कलश हे सुख आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं.
3. घरात ठेवलेला कलश भक्तिमय वातावरण निर्माण करून घरात चैतन्य आणतो.
4. कलश हे गणेशाचे रूप देखील मानलं जातं, त्यामुळे घरातील आणि आयुष्यातील अडचणी दूर होतात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)