Chandra Grahan 2024 on Holi 2024 : रंगांचा हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 24 मार्चला होलिका दहनाचा उत्साह तर 25 मार्चला रंगांची उधळण करण्यात येणार आहे. यंदाची होळी अतिशय खास आहे, कारण वैदिक ज्योतिषशास्त्रादृष्ट्या आणि खगोलशास्त्रीयनुसार या दिवशी या वर्षातील पहिलं ग्रहण आहे. हे ग्रहण चंद्राला लागणार आहे. ज्योतिषशास्त्रा ही अशुभ घटना मानली जाते. याचा अर्थ होळीच्या रंगावर चंद्रग्रहणाची सावली असणार आहे. मग अशास्थितीत होळीच्या दिवशी रंगांची उधळण करता येणार आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शिवाय फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरा करण्यात येते. पौर्णिमेला स्नान दानला अतिशय महत्त्व आहे. मग पौर्णिमेला स्नान नेमकं कधी करायचं या अशा अनेक प्रश्नांची उत्तर आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांनी दिलंय. (Chandra Grahan 2024 Will the shadow of the lunar eclipse play colors on the festival of Holi Panditji said its time to color)
वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 25 मार्चला सकाळी 10:24 वाजेपासून दुपारी 03:01 वाजेपर्यंत असणार आहे. याच दिवशी होळीचा सण असणार आहे. ग्रहणाचा सुतक कालावधी हा 9 तास आधी सुरू होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार सुतकादरम्यान कोणतेही शुभ कार्य करायचे नसतात.
आनंद पिंपळकर सांगता की, या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही. त्यामुळे याचा परिणाम आणि सुतक काळ भारतात होणार नाही आहे. तरीदेखील आनंद पिंपळकर यांनी चंद्रग्रहणाची वेळ आणि फाल्गुन पौर्णिमेच्या स्नान आणि दानाची वेळ सांगितली आहे. भारतात चंद्रग्रहण दिसणार नसल्याने होळीला रंगांची उधळण करुन आनंद साजरा करु शकणार आहात. चंद्रग्रहणाचा होळीच्या रंगावर परिणाम होणार नाही.
पंचांग पाहता फाल्गुन पौर्णिमा स्नान दानाची वेळ ही 24 मार्चला सकाळी 09:54 वाजेपासून 25 मार्चला दुपारी 12:29 वाजेपर्यंत असणार आहे. अशा स्थितीत तुम्ही फाल्गुन पौर्णिमेला 25 मार्चला म्हणजेच होळीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून स्नान केल्यानंतर दान करा.
ब्रह्म मुहूर्त - 25 मार्चला पहाटे 04:45 वाजेपासून स्नान मुहूर्त
धुलिवंदन किंवा धुरवड म्हणजे रंगांची उधळण ही 25 मार्चला असून पंचांगानुसार यादिवशी वृद्धी योग असणार आहे. हा योग 24 मार्चला रात्री 8.20 पासून दुसऱ्या दिवशी 25 मार्चला रात्री 09:30 वाजेपर्यंत असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वृद्धी योगात शुभ कार्य करु शकता. अगदी वृद्धी योगात पौर्णिमा स्नान, दान, पूजा आणि रंगांची उधळण तुमचा आनंद द्विगुणीत करेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)