Horoscope 05 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी ऑफिसमध्ये रोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं काम कराल त्याचा तुम्हाला फायदाच होईल. रखडलेली सर्व काम आज मार्गी लागतील.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीकोनातून आज प्रयत्न कराल. काम पूर्ण झाल्यावर दिवसभर एक वेगळाच उत्साह जाणवेल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी अनेक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याचा आज फायदा होईल. आज अनेक काम सहज पूर्ण होऊ शकतात.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायात आज टार्गेट ठेवून काम करा. समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर करा.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी जवळच्या व्यक्तींकडून राजकारण होत असल्याचं पाहायला मिळेल. भूतकाळातील गोष्टींचा विचार करून दिवस घालवू नका.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी संकटातून मार्ग काढण्यासाठी मित्र मदत करतील. परिवारासोबत दिवस चांगला जाईल. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींना भावंडांकडून आणि मित्र परिवाराकडून मदत मिळेल. मेहनत जास्त असेल पण यश देखील मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी तुमच्या जुन्या मित्राशी संवाद होईल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी कोणती तरी चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा. ऑफिसमध्ये कामाची तपासणी होऊ शकते.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. तुमच्या निर्णयात स्पष्टपणा असेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.