Horoscope 14 August 2024 : प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनावर ग्र, नक्षत्रांचा परिणाम होत असतो. अशावेळी आपल्याला जर आपल्या भविष्याची जाणीव असेल तर आपण नक्कीच सतर्क राहू शकतो. यासाठी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य .
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस मेष राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. घरी शुभ कार्य होतील पण त्यामध्ये काही अडथळ्यांना सामोरे जावे लागते. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
कामाच्या ठिकाणी तुमचं सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. कुटुंबासाठी वेळ द्या. तुमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाची काम लक्षपूर्वक करा.
मिथुन (Gemini Zodiac)
आज शरीरासह मान-सन्मान हानी होण्याची शक्यता आहे. कामात खराब वागणूक असूनही, समाधानकारक आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठीही अनुकूल असणार आहे. तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. मात्र ती दुपारच्या सुमारास पूर्ण झाल्यामुळे आनंद असणार आहात.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. सगळ्या गोष्टी मनासारख्या होतीलच असं नाही पण जे घडेल तर फायदेशीर ठरेल. मुलांसोबत वेळ घालवा. पत्नीच्या मनाचा विचार करुन निर्णय घ्या.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुपारपर्यंतचा काळ चांगला राहणार आहे. यानंतर आर्थिक लाभापेक्षा खर्च जास्त होणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती किंवा इतर कारणांमुळे अहंकाराबाबत कुटुंबात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra Zodiac)
तूळ राशीच्या लोकांनी आपली विशेष काळजी घ्या. आज आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एवढंच नव्हे तर कामाच्या ठिकाणी देखील थोडा ताण असेल. या सगळ्याचा परिणाम कुटुंबावर होणार नाही याची काळजी घ्या.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुपारपर्यंतचा काळ चांगला राहणार आहे. यानंतर आर्थिक लाभापेक्षा खर्च जास्त होणार आहे. वडिलोपार्जित संपत्ती किंवा इतर कारणांमुळे अहंकाराबाबत कुटुंबात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
धनु राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. दिवसभर मन प्रसन्न राहिल. तुमच्या आनंदाचा विचार करा. कुटुंबासाठी छान वेळ घालवाल. जुन्या व्यवहारांमधून फायदा होईल.
मकर (Capricorn Zodiac)
काही वेळी चांगल्या गोष्टीसाठी वाट बघावी लागतात. तोच आजचा दिवस आहे. मन दुःखी करु नका. काही गोष्टी आनंदाने स्वीकारा. तुमचा सन्मान वाढेल म्हणून तुम्हाला अभिमान वाटणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. व्यापार किंवा सामाजिक क्षेत्रात फसवणूक होण्याची अधिक शक्यता आहे. पूर्ण झालेला करार अचानक रद्द केल्याने आर्थिक समस्या निर्माण होईल.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस खास असेल. थोडं शांत राहा कारण काही गोष्टी सोडण्यातच खरा अर्थ असतो. मुलांकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. जोडीदारासोबतचे खास क्षण महत्त्वाचे ठरतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.