Daily Horoscope : गणेश चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर रोज मनोभाव पाहुणचारानंतर आज अनंत चतुर्दशीला गणरायाच विसर्जन करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेशासह श्रीहरीची पूजा करण्यात येते. आज भाद्रपद पौर्णिमेसह चंद्र मंगळ नववा पंचम योग तयार झालाय. अशात बाप्पा गावी जाताता या लोकांचं नशीब चमकवणार आहे.
आजचा दिवस अनुकूल असणार आहे. नोकरीत प्रभाव असेल. प्रवास यशस्वी होणार आहे. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून फायदा होईल. परीक्षेत यश मिळेल. तुम्ही कोणत्याही क्रीडा स्पर्धेत भाग घेत असाल तर विजय 100% शक्य आहे. नोकरी-व्यवसायात परिस्थिती तुमच्या अनुकूल आहे. प्रियजनांशी संबंध मधुर असणार आहे. एकंदीत बाप्पा तुमच्यावर प्रसन्न असणार आहेत.
आज काही मोठे काम झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहणार आहे मात्र घाई करु नका. वेळेचे भान ठेवून आज कोणतेही काम केल्यास त्याचे परिणाम सुखद होतील. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल. वैयक्तिक संबंधांमध्ये समन्वय ठेवा. तुमच्या जोडीदारामुळे आर्थिक लाभ होईल.
आज तुम्हाला भेटवस्तू मिळणार आहे. नोकरीत तुमची स्थिती मजबूत असणार आहे. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. समाजातील परिस्थिती सामान्य होणार आहे. धार्मिक कार्यावर देवाचा आशीर्वादांचा वर्षाव होईल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे फायदा होईल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सामान्य राहील.
आज तुम्हाला प्रत्येक समस्येचे समाधान मिळेल. इतरांना वाईट वाटेल असे विनोद करू नका. नोकरीत तुम्हाला तुमच्या बॉसकडून जबाबदारी मिळेल, पण सहकाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. व्यवसायात सावध राहा, कोणाची फसवणूक होऊ शकते. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
आज धार्मिक यात्रा करणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात परिस्थिती सामान्य राहील आणि नोकरीत सहकाऱ्यांकडून लाभ मिळेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आज खर्च जास्त होईल. नात्यात सामान्य स्थिती राहील. आरोग्यामुळे आज त्रास होऊ शकतो. कोणताही गोंधळ विवेकबुद्धीने सोडवाल. मुलांसोबत मस्ती कराल, विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील.
आज मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गमावलेली रक्कम परत मिळवता येईल. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत चिंतेत राहू शकता. तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला कामात अडचणी येऊ शकतात. व्यवसाय सामान्य राहील. तुमच्या पत्नीशी मतभेद होतील, मात्र तुम्ही हे प्रकरण शहाणपणाने सोडवाल. मित्रांच्या भेटीमुळे दिवस ताजेतवाने जाईल.
आजचा दिवस संमिश्र असणार आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत चिंतेत राहू शकता. बाहेर जाण्यापूर्वी खबरदारी घ्या आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास आणि धांदल उडेल. नोकरीत यश मिळाल्याने कुटुंबातील आनंद द्विगुणित होईल.
आजचा दिवस शुभ असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार आहे. सामाजिक कार्यात रुची राहील. आर्थिक प्रगती सोबत आर्थिक लाभ होणार आहे. नोकरीत बढती आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. लोकांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे प्रत्येक काम सोपे होईल.
आजचा दिवस चांगला जाणार आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. सरकारी कामात प्रगती होईल. नवीन करार केले जातील. तुम्हाला अपेक्षित नफा देखील मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरदार लोकांसाठी प्रगतीची वेळ आहे.
आज धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. आज लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. यामुळे तुम्ही त्रस्त राहाल. तुमच्या मुलामुळे तुम्हाला आनंद वाटेल. मुलाचा झेंडा अभ्यासात फडकणार. नोकरी-व्यवसायात परिस्थिती सामान्य राहील. तब्येतीची चिंता राहील. तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू घरबसल्या खरेदी करू शकता.
आज सावध राहा. दिवस नकारात्मक असू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा. नोकरीत वेळ चांगला जाणार आहे. कुटुंबासाठी आनंदाचा काळ आहे. तब्येतीची चिंता राहील.
आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आज निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका अन्यथा तुमचा राग कायम राहील. आज तुम्हाला कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक बाबतीत थोडी सुधारणा होईल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ संमिश्र राहील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.