Horoscope 6 June 2024 : आज शनि जयंती! मेष ते मीनपर्यंत कसा असेल तुमचा दिवस?

Horoscope 6 June 2024 : आज शनि जयंती असल्याने कोणावर शनिदेवाची कृपा बसरणार आणि कोणाला अडचणीचा सामना करावा लागेल जाणून घ्या मेष ते मीनपर्यंत सर्व राशींच्या लोकांचा आजचा दिवस कसा जाईल ते. 

नेहा चौधरी | Updated: Jun 6, 2024, 08:43 AM IST
Horoscope 6 June 2024 : आज शनि जयंती! मेष ते मीनपर्यंत कसा असेल तुमचा दिवस? title=
daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 6 june 2024

Horoscope 6 June 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज शनि जयंतीसह अनेक योग जुळून आले आहेत. अशात सर्व राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या ज्योतिषी प्रितिका मजुमदार यांच्याकडून

मेष (Aries Zodiac)  

आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जुने आजार पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. उत्पन्नात निश्चितता असणार आहे. व्यवसाय चांगला असणार असून फायदा होईल. 

वृषभ (Taurus Zodiac) 

आजचा दिवस संमिश्र जाणार आहे. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व बाजूंनी यश तुम्हाला लाभणार आहे. वाईट लोक नुकसान करणार आहेत. संशयामुळे कामाची गती मंद होईल. कुटुंबातील काही सदस्यांच्या तब्येतीची चिंता असणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

आजचा दिवस उत्तम असणार आहे. घाई करू नका कौटुंबिक सहकार्यामुळे काम सोपे होणार आहे. इतरांच्या कामात ढवळाढवळ टाळा. निष्काळजीपणा करु नका. तुमच्या जोडीदाराशी वाद होईल. मोठे प्रॉपर्टी डील मोठा नफा मिळवून देणार आहे. बेरोजगारी दूर होणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

आजचा दिवस उत्तम असणार आहे. पैशाशी संबंधित इच्छा पूर्ण होणार आहे. कौटुंबिक समारंभात सहभागी होणार आहात. तुम्हाला स्वादिष्ट भोजनाचा आनंद मिळणार आहे. बौद्धिक कार्य यशस्वी होणार आहे. लाभाची शक्यता असणार आहे. प्रवास करताना काळजी घ्या. वाद घालू नका. 

सिंह (Leo Zodiac) 

आजचा दिवस संमिश्र असणार आहे. किरकोळ आजार वगळता आरोग्य सामान्य असेल. अधीनस्थांकडून सहकार्य मिळणार नाही. वाईट संगत टाळा, नुकसान होईल. धोकादायक आणि जोखमीची कामे टाळा. उत्पन्नात निश्चितता राहील. बेफिकीर राहू नका. काही वाईट बातमी मिळेल. 

कन्या (Virgo Zodiac)   

तुम्हाला आज शुभ कार्याचा लाभ होणार आहे. मानसन्मान वाढणार आहे. मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे बाळगा. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आनंदी असेल. नवा उपक्रम सुरू करण्याची योजना आखली जाणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसाय चांगला होणार आहे. शत्रू शांत राहणार आहे. दूरवरून चांगली बातमी मिळणार आहे. आत्मविश्वास वाढणार असून काही मोठे काम करण्याची योजना आखणार आहात. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

आजचा दिवस संमिश्र असेल. प्रवास मनोरंजक ठरणार आहे. नोकरीत अनुकूलता असेल. नफा वाढेल पण गुंतवणुकीत घाई करू नका. भागीदारांचे सहकार्य मिळणार आहे. महत्त्वाच्या वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात घाई करू नका. अनपेक्षित लाभ होईल. 

धनु (Sagittarius Zodiac) 

आजचा दिवस संमिश्र असून उत्पन्नात घट होईल. व्यवसायाची गती मंद होणार आहे. धोकादायक आणि जोखमीची कामे टाळा. अनपेक्षित खर्च वाढणार आहे. प्रवासात घाई करू नका. चिंता आणि तणाव असणार आहे. आरोग्य कमजोर असेल.  आरोग्यावर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   

आजचा दिवस संमिश्र असून घरामध्ये अचानक आजारी पडल्याने तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे. व्यावसायिक प्रवास तुमच्या सोयीनुसार होणार आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्हाला वाईट वाटणार आहे. विवेकाचा वापर केल्यास नफा मिळणार आहे. तुम्हाला काही मोठ्या अडथळ्याचा सामना करावा लागणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

आज दिवसाच्या सुरुवातीपासूनच मनात क्रोध असणार आहे. नवे आर्थिक धोरण तयार करा. कामकाजात सुधारणा होणार आहे. जुनाट आजारामुळे समस्या निर्माण होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. व्यवसायात वाढ होणार आहे. ऐश्वर्यावर खर्च होईल. भावांची साथ असून काळ अनुकूल असणार आहे. 

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस तुम्हाला लाभाच्या संधी देणारा ठरणार आहे. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. व्यवसाय तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होणार आहे. नोकरीत सहकारी तुम्हाला साथ देतील. गुंतवणूक शुभ राहील. प्रभावशाली लोकांशी ओळख होईल. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)