मुंबई : दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.
व्यापारी आणि शेतकरी वर्गात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थांचे वाटप केले जाते. नोकरी, व्यवसाय यानिमीत्त परगावी असलेली कुटूंबातील मंडळी एकत्र येतात. आनंदाने दिवळी साजरी करतात.
आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते.
शेतऱ्यांसाठी शेतातून आलेले नवे धान्य हेच त्याचे खरे धन असते. हीच त्याची संपत्ती असते. त्यामुळे तो धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गुळ, खोबरे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच झेंडू, शेवंती यांच्या फूलांचा हार, फुले देवाला वाहतात. आजच्या दिवशी अंगणभर पणत्या लावल्या जातात. घरांना विद्यूत रोषनाई केली जातो. घरे, गाव, शहरे व सारा आसमंत पणत्या आणि विद्यूत रोषनाईने उजळून निघतो. व्यापाली व शेतकरी वर्गात आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.