...नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच

Money Plant: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू आणि झाडाचं विशेष असं महत्त्व आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक उपाय देण्यात आले आहेत. मनी प्लांटला (Money Plant) वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आलं आहे. मनी प्लांट ड्राइंग रुम, बेडरुम आणि बालकनीत लावू शकता.

Updated: Dec 7, 2022, 07:29 PM IST
...नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच title=

Money Plant: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू आणि झाडाचं विशेष असं महत्त्व आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक उपाय देण्यात आले आहेत. मनी प्लांटला (Money Plant) वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आलं आहे. मनी प्लांट ड्राइंग रुम, बेडरुम आणि बालकनीत लावू शकता. ज्या घरात मनी प्लांट असतं त्या देवी लक्ष्मीची कृपा असते. पण मनी प्लांट लावताना काही नियम पाळणं आवश्यक आहे. मनी प्लांट लावताना काही चुका केल्यास तुम्हाला फटका बसू शकतो. जाणून घ्या मनी प्लांट लावण्याचे नियम...

या दिशेला लावा मनी प्लांट- वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधील घराच्या उत्तर पूर्व दिशेला लावू नये. यामुळे आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो. या चुकीमुळे खर्चात वाढ होऊ शकते. त्याचबरोबर उत्पन्नाचे स्रोतात अडचण येऊ शकते. मनी प्लांट कायम दक्षिण पूर्व दिशेला लावलं पाहीजे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. त्याचबरोबर मनी प्लांट वॉशरुमजवळ लावू नये.

वरच्या दिशेने वाढतं असावं- मनी प्लांट लावल्यानंतर त्याची वाढ कोणत्या दिशेने होते हे देखील महत्त्वाचं आहे. मनी प्लांट लावल्यानंतर ते कधीही जमिनीला टेकणार नाही याची काळजी घ्या. कारण वेल सरळ वाढत असेल तर प्रगती होत असल्याचं मानलं जातं. 

बातमी वाचा- Annapurna Jayanti 2022: 8 डिसेंबरला अन्नपूर्णा जयंती, या दिवशी चुकूनही करू नका अशी कामं

 

मनी प्लांट टवटवीत राहिलं पाहीजे- मनी प्लांट लावल्यानंतर सुकू नये याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मनी प्लांट सुकल्यास आर्थिक अडचणीचे संकेत असतात. यामुळे व्यक्ती कायम कर्जाच्या ओझाखाली वावरतो.

मनी प्लांट घेऊ नये- वास्तुशास्त्रानुसार कधी कोणाकडूनही मनी प्लांट मागू नये. मनी प्लांटची देवाण-घेवाण अशुभ मानली जाते. यामुळे शुक्र ग्रह प्रभावित होतो. तसेच आर्थिक अडचण वाढू शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)