Gajakesari Yog In Meen Rashi: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरासोबत काही शुभ अशुभ योग तयार होतात. काही योग इतके जबरदस्त असतात की, अडकलेली कामं पूर्ण होतात. असाच एक शुभ योग 5 नोव्हेंबर 2022 ला जुळून आला आहे. शनिवारी मीन राशीत गजकेसरी योग तयार होत आहे. या दिवशी शनिदेवांची पूजा केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील. 23 ऑक्टोबरला शनिदेव (Shani Dev) मार्गस्थ झाले आहेत. हा योग मीन राशीत तयार होणार असून मीन (Meen) आणि कुंभ (Kumbh) राशीच्या लोकांना फलदायी ठरणार आहे. 5 नोव्हेंबरला चंद्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत आधीच गुरू ग्रह वर्षभरासाठी ठाण मांडून बसला आहे. अशात शनिवारी गजकेसरी योग (Gajakesari Yog) जुळून आला आहे. विशेष म्हणजे या दिवशी प्रदोष व्रत असल्याने पूजा केल्यास अधिक पटीने फळ मिळेल.
शनिदेव कुंभ राशी आणि गुरु बृहस्पती मीन राशींचा स्वामी आहे. त्यामुळे या दिवशी पूजा केल्यास चांगलं फळ मिळेल. शनिवारी लवकर उठून स्नान करा. शनि मंदिरात जाऊन पूजा आणि मंत्रोपसना करा. संध्याकाळी शनिमंदिरात तिळाचा दिवा लाववा आणि काळे तीळ दान करा. शनिचालिसा आणि शनि मंत्राचा जाप करा. तसेच सुंदररकांडचं पठण करणंही फलदायी ठरेल.
Chanakya Niti: कुत्र्यामधील हे गुण पुरुषांमध्ये असल्यास महिला होतात खूश, जाणून घ्या चाणक्य नीति
शनिदेवांना नम्र भाव आवडतो. त्यामुळे कोणचाही अपमान करू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीला विनाकारण दु:ख देऊ नये. तसेच आवशक्यतेनुसार दुसऱ्यांना मदत करा. कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्रान्तक, यम, सौरि, शनैश्चर, मन्द, पिप्पलाश्रय या दहा नावांचा जप करा. पिंपळाच्या झाडाजवळ बसून या दहा नावांचा जप करा. तसेच ओम शं शनैश्चराय नम: या मंत्रासह एक माळ ओढा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)