Gajlaxmi-Amla Rajyog : गुरु गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मालामाल होण्याची संधी

Gajlaxmi-Amla Rajyog : जेव्हा कुंडली किंवा राशीत ग्रह एकत्र असतात तेव्हा कधी नवे योग आणि राजयोग तयार होतात. गुरु आता मेष राशीत प्रवेश करत आहे. यामुळे अमला राजयोग आणि गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 9, 2023, 05:40 AM IST
Gajlaxmi-Amla Rajyog : गुरु गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मालामाल होण्याची संधी title=

Gajlaxmi-Amla Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या निश्चित वेळेच्या अंतराने राशी बदलतात. जेव्हा ग्रहस्थिती आणि नक्षत्रांमध्ये कोणताही बदल होतो तेव्हा त्याचा ज्योतिषशास्त्रात विशेष अर्थ मानला जातो. ग्रहांच्या बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर काही ना काही काही परिणाम होत असतो. ग्रहांच्या बदलामुळे अनेकदा राजयोद देखील तयार होतात. 

जेव्हा कुंडली किंवा राशीत ग्रह एकत्र असतात तेव्हा कधी नवे योग आणि राजयोग तयार होतात. गुरु आता मेष राशीत प्रवेश करत आहे. यामुळे अमला राजयोग आणि गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. दरम्यान या राजयोगाचा काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम होणार आहे. 

काय आहेत हे दोन्ही राजयोग? 

ज्यावेळी राहू मेष राशीत असतो आणि त्याच वेळी गुरु मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा गजलक्ष्मी योग तयार होतो. तर ज्या राशीत गजलक्ष्मी योग तयार होतो, त्या राशीत शनीची सती संपते आणि संपत्ती आणि सुखात वृद्धी होते. या दोन्ही राजयोगांमुळे काही लोकांच्या घरात सुख-शांती नांदणार आहे. 

मेष रास

गुरूच्या चालीमध्ये बदल झाल्यामुळे निर्माण झालेला गजलक्ष्मी राजयोग प्रत्येत कार्यात यशस्वी ठरणार आहे. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहणार आहे. आर्थिक लाभ आणि व्यवसायात नवीन संधी मिळणार आहे. एखाद्याच्या भागीदारीत केलेली गुंतवणूक आणि व्यवसाय शुभ परिणाम देणार आहे. मेहनतीच्या जोरावर तुम्ही प्रत्येक प्रकारे प्रशंसा मिळवाल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना आमला योगामुळे खूप फायदा होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही प्रत्येक अडचणीतून मुक्त होणार आहात.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांना मेष राशीत अमला योग तयार झाल्यामुळे विशेष लाभ मिळू शकतो. यावेळी करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी काळ चांगला राहणार आहे. आर्थिक स्थितीही मजबूत असू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. 

कर्क रास

गजलक्ष्मी राजयोग बनल्याने नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. अडकलेले किंवा जुने पैसे परत मिळू शकतात. भाग्य तुमच्या बाजूने असू शकते. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकणार आहे. कोर्ट- कोर्ट केसेसमध्ये तुमच्या बाजूने निर्णय येऊ शकतो. कामात यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामे होतील.

मीन रास

गजलक्ष्मी राजयोगामुळे भाग्य तुमच्या बाजूने राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलाच्या प्रगतीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ आणि मान-सन्मानात वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. अमला राज योगाने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मुलांकडून कोणताही आनंद मिळू शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )