पैशांच्या बाबतीत ‘या’ 3 राशींच्या मुली असतात प्रचंड नशीबवान, तुमची रास कोणती?

ज्योतिषशास्त्रामध्ये अशा 3 राशी आहेत, ज्या राशीच्या मुली पैसे कमवण्यात अग्रेसर असतात.

Updated: Mar 26, 2022, 05:38 PM IST
पैशांच्या बाबतीत ‘या’ 3 राशींच्या मुली असतात प्रचंड नशीबवान, तुमची रास कोणती?  title=

मुंबई : ज्येतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राशींवर मोठा प्रभाव असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्वं हे त्यांच्या राशींनुसार वेगवेगळं असतं. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा 3 राशी आहेत, ज्या राशीच्या मुली पैसे कमवण्यात अग्रेसर असतात.

वृषभ (Taurus)

या राशीच्या मुली पैसे विचारपूर्वक खर्च करतात. पैशांच्या बाबतीत त्या कायम सतर्क असतात. अशा मुलींना मनी माइंडेडही म्हटलं जातं. या राशीच्या मुली पैशांच्या बाबतीत इतरांवर मात करतात. व्यवसायात त्यांना कमाल यश मिळतं. या राशींच्या मुलींवर कुबेराची कृपा असते.

तुळ (Libra)

व्यवसायात या राशीच्या मुली उत्तम प्रगती करतात. पैसे कमवण्याची प्रबळ इच्छा त्यांना पुढे आणत असते. मेहनतीनं या मुली बराच पैसा कमवतात. तुळ राशीचे स्वामी शुक्र आहेत. ज्यामुळे शुक्राच्या कृपेनं या मुली पैशांच्या बाबतीत मागे पडत नाहीत.

मकर (Capricorn)

मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. ज्यामुळं या राशींच्या मुलींवर शनी देवाची कृपा असते. या मुली कर्मठ स्वभावाच्या असतात. ज्यामुळं त्यांना करिअरमध्ये अपेक्षित उंची गाठता येते. धन संग्रहीत करण्याच्या कामात त्या निपुण असतात. एक एक पैसा जमवून पैसा जमवण्याची त्यांना सवय असते.