December Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत

Grah Gochar 2023 December :  डिसेंबर या वर्षाचा शेवटचा महिना हा ज्योतिषशास्त्र आणि ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रह गोचर काही राशींचं भाग्य उजळून जाणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 22, 2023, 07:45 AM IST
December Grah Gochar : डिसेंबर महिन्यात ग्रहांचं महागोचर! 5 ग्रह करणार तुम्हाला श्रीमंत  title=
grah gochar will happen in the month of December 5 planets will give wealth to these zodiac signs

Grah Gochar 2023 December : बघता बघता 2023 ला निरोप देण्याची वेळ आली आहे. या वर्षाचा शेवटचा महिना हा वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. डिसेंबर महिन्यातील ग्रहांचं महागोचर हे 12 राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे काहींचं नशीब उजळणार आहे, तर काहींच्या नशिबात कष्ट असणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुध आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध  13 डिसेंबरला धनु राशीत मागे जाणार आहे. तर 16  डिसेंबरला सूर्य धनु प्रवेश करणार आहे. त्यानंतर 25 डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत असणार आहे शुक्र पाठोपाठ मंगळ 27 डिसेंबरला वृश्चिक राशीतून धनु राशीत गोचर करणार आहे. सुर्यामुळे डिसेंबर महिन्यात आदित्य मंगल योग निर्माण होणार आहे. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी गुरु वक्री स्थितीत येणार आहे. (grah gochar will happen in the month of December 4 planets will give wealth to these zodiac signs )

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी डिसेंबरमध्ये होणारे ग्रह गोचर नशिब पलटणार ठरणार आहे. या राशीच्या लोकांना येत्या वर्षात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची आणि कुटुंबातील सदस्यांची साथ मिळणार आहे. नोकरी व्यवसायात नवीन प्रयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्रह गोचर यश घेऊन येणार आहे.

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप लकी सिद्ध होणार आहे. शुक्र स्वतःच्या राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांना एकामागून एक प्रगतीच्या अप्रतिम संधी लाभणार आहात. अडकलेले पैसे परत तुम्हाला मिळणार आहे. तर व्यवसायात अपेक्षित यश मिळणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. लग्न इच्छुक लोकांना जोडीदार भेटणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला चांगलं वातावरणाचा अनुभव येणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac)

डिसेंबरमध्ये ग्रहांचं गोचर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येणार आहे. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसणार आहे. वाहन किंवा जमीन खरेदीचे योग आहेत. गुंतवणूक ही तुमच्या फायद्याची ठरणार आहे. डिसेंबरमधील ग्रह गोचर नवीन वर्षाच्या प्रगती आणि यश घेऊन येणार आहे. नवीन व्यवसायासाठी हा उत्तम काळ असणार आहे. कामातून आर्थिक फायदा होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Rajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! 'या' राशींना आकस्मिक धनलाभ

मकर (Capricorn Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी डिसेंबरमधील ग्रह संक्रमण खूप शुभ ठरणार आहे. जी कामं तुम्ही बरेच दिवस पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता ती आता मार्गी लागणार आहे. तुम्हाला हवा तसा जोडीदार मिळणार आहे. मकर राशीचे लोक देखील पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत खूप भाग्यवान ठरणार आहे. या राशीच्या लोकांची पैसा कमावण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे. सर्व प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांना डिसेंबरमध्ये ग्रह संक्रमणाच्या प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात विशेष लाभ मिळणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर या वर्षी तुमची बढती निश्चित होणार आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हीला नफा मिळणार आहे. पैसा आणि करिअरच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर आता दूर होणार आहेत. तुमचं भाग्य चमकणार असून तुमच्या सर्व योजना पूर्ण होणार आहात. प्रेम जीवनाच्या बाबतीतही तुम्ही भाग्यवान ठरणार आहात. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाणार असून तुमचं प्रेमसंबंध मजबूत होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)