Guru Vakri 2022: शनि पाठोपाठ गुरू ग्रहही होणार वक्री! 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ

शनि पाठोपाठ धनकारक गुरू ग्रह आता वक्री होणार आहे. 29 जुलैपासून गुरु ग्रह स्वतःच्या राशीच्या मीन राशीत वक्री होणार आहे.

Updated: Jun 28, 2022, 12:14 PM IST
Guru Vakri 2022: शनि पाठोपाठ गुरू ग्रहही होणार वक्री! 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ title=

Guru Vakri 2022 in July:  शनि पाठोपाठ धनकारक गुरू ग्रह आता वक्री होणार आहे. 29 जुलैपासून गुरु ग्रह स्वतःच्या राशीच्या मीन राशीत वक्री होणार आहे. 13 एप्रिल 2022 रोजी गुरु ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे. गुरु वक्री होणार असल्याने चांगले आणि वाईट सर्व राशींवर परिणाम होतील. या स्थितीत 4 राशी भाग्यवान सिद्ध होतील. कारण वक्री गुरूची त्यांच्यावर कृपा असेल. 

वक्री गुरू 'या' राशींना लाभ देईल

वृषभ : वक्री गुरू वृषभ राशीच्या लोकांना भरपूर लाभ देईल. या काळात आर्थिक सुबत्ता वाढेल. चांगल्या पगाराची नवीन नोकरी मिळू शकते किंवा पगार वाढू शकतो. व्यवसायात भरपूर फायदा होईल. कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्य चांगले राहील.

मिथुन : वक्री गुरू मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल परिणाम देईल. थोडासा प्रयत्न देखील मोठा फायदा देईल. करिअरमध्ये कोणीतरी मदत करेल, जे खूप फायदेशीर सिद्ध होईल.

कर्क : गुरु ग्रहाची वक्री चाल कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला काळ आणेल. हा काळ त्यांना सर्व काही देईल. पद, पैसा आणि प्रतिष्ठा या काळात मिळेल. अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीतून लाभ होईल.

कुंभ : मीन राशीतील वक्री गुरू कुंभ राशीच्या लोकांना लाभ देईल. व्यवसायात यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांनाही फायदा होईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. या काळात तुम्हाला लोकप्रियता मिळेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)