Hartalika 2023 : आज हरितालिकेचा व्रत असल्याने महिलांमध्ये उत्साह असणार आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत केलं जातं. पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका व्रत असतो. काही भागात याला हरतालिका तीज असंही म्हटलं जातं. यादिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. तर अविवाहित तरुणी भावी जोडीदारासाठी व्रत करतात. यादिवशी महिला आणि तरुणी रात्रभर जागरण करत झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ खेळतात. (Hartalika Teej or Hartalika vrat auspicious yoga puja muhurta vidhi katha in marathi)
ही हरितालिका अगदी खास आहे, कारण हरितालिकेचं व्रत हे माता पार्वती आणि शंकर भगवानला समर्पित असतो. तर सोमवार हा वार भोलेनाथला समर्पित आहे. आज सोमवार आणि त्यात हरितालिका व्रत असं दुहेरी योग जुळून आला आहे. त्यात पंचांगानुसार रवि आणि इंद्र योग आहे. या मुहूर्तावर भोलेनाथाची पूजा केल्यास ते प्रसन्न होतात असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
इंद्र योग - पहाटे 04.28 वाजेपासून 19 सप्टेंबर 2023 पहाटे 04.24 वाजेपर्यंत
रवि योग - दुपारी 12.08 वाजेपासून 19 सप्टेंबर 2023 सकाळी 06.08 वाजेपर्यंत
हरितालिका 2023 तृतीया तिथी - 17 सप्टेंबर 2023 सकाळी 11.08 वाजेपासून 18 सप्टेंबर 2023 12:39 वाजेपर्यंत
हरतालिका पूजा मुहूर्त - सकाळी 06.07 ते 18 सप्टेंबर 2023 सकाळी 08.34 वाजेपर्यंत
प्रदोष काल मुहूर्त - सकाळी 06.23 वाजेपासून संध्याकाळी 06.47 वाजेपर्यंत
पहिली प्रहर पूजा - संध्याकाळी 06.23 वाजेपासून रात्री 09.02 वाजेपर्यंत
दुसरी प्रहार पूजा - रात्री 09.02 वाजेपासून रात्री 12.15 रात्री वाजेपर्यंत
तिसरी प्रहार पूजा - रात्री 12.15 वाजेपासून मध्यरात्री 03.12 वाजेपर्यंत
चौथी प्रहार पूजा - पहाटे 03.12 वाजेपासून 19 सप्टेंबरला सकाळी 6.08 वाजेपर्यंत
आज कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया शंकराच्या पिंडीवर 16 पत्री अर्पण करतात. मात्र त्यात वाहण्यात येणाऱ्या 16 पत्री कोणत्या आणि त्या प्रत्येक पत्रीचं महत्व काय हे आज आपण जाणून घेणार आहात.
1. बेलपत्र- शिवतत्व आणि शक्ती चे प्रतीक
2. आघाडा- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
3. मालती- शिव आणि शक्ती चे प्रतीक
4. दुर्वा- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
5. चंपक- महाकाली चे प्रतीक
6. करवीर- शक्ती चे प्रतीक
7. बदरी- शिव आणि शक्ती चे प्रतीक
8. रुई- हनुमान आणि शक्ती चे प्रतीक
9. तुळस- विष्णु आणि शक्ती चे प्रतीक
10. मुनिपत्र- निर्गुण चे प्रतीक
11. दाडिमी- शिव आणि शक्ती चे प्रतीक
12. धोतरा- शिव आणि शक्ती चे प्रतीक
13. जाई- शक्ती चे प्रतीक
14. मुरुबक- महाकाली चे प्रतीक
15. बकुळ- गणपती आणि शक्ती चे प्रतीक
16. अशोक- ब्रह्म आणि शक्ती चे प्रतीक\
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीने भगवान भोलेनाथाला मनोमनी वर म्हणून स्विकारलं होतं. पण पार्वती यांच्या वडिलांनी विष्णूशी त्यांचं लग्न ठरवलं होतं. अशावेळी पार्वतीच्या सखीने तिचं अपहरण करुन तिला जंगलात नेलं. तिथे माता पार्वतीने भोलेनाथाची कठोर तपश्चर्या केली. माता पार्वतीने भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा केली. पार्वती या पूजेने शंकर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्विकार केला. तेव्हा पासून हा दिवस हरितालिका तीज म्हणून साजरा करण्यात येतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)