Horoscope 02 November 2021 | धनत्रयोदशीला 'या' राशीच्या लोकांचं भाग्य फळफळेल, असा असेल मंगळवार

कसा असेल मंगळवार (Horoscope 02 November 2021) जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे सुपुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. 

Updated: Nov 1, 2021, 08:58 PM IST
Horoscope 02 November 2021 | धनत्रयोदशीला 'या' राशीच्या लोकांचं भाग्य फळफळेल, असा असेल मंगळवार title=

मुंबई : संपूर्ण देशात दिवाळीचा माहोल आहे. आज धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. मंगळवार मेष, सिंह आणि कर्क राशीसाठी चांगला राहणार आहे. तर मिथुन राशीसाठी संघर्षपूर्ण असा दिवस असेल. मात्र मिथुन राशिच्या लोकांना कुटुंबियांची साथ लाभेल. कसा असेल मंगळवार (Horoscope 02 November 2021) जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे सुपुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 02  November 2021 The fate of these zodiac signs will shine on Dhanteras know your astrology prediction) 

मेष (Aries) : कार्यालयीन कामात चांगली कामगिरी राहिल. संवादाच्या जोरावर भविष्यात शिखरावर पोहचाल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील. मात्र मनात भितीचं वातावरण राहिल. 

वृषभ (Taurus) : नशिब तुमच्यासोबत असेल. मगंळ कार्यात सहभागी व्हाल. मधुर वाणीमुळे इतरांना आकर्षित कराल. बुद्धी आणि हुशारीच्या जोरावर यशस्वी व्हाल.

मिथुन (Gemini) : दिवस अपेक्षेप्रमाणे फार चांगला जाणार नाही. संघर्षपूर्ण स्थितीचा सामना करावा लागेल. अशा अडचणीत कुटुंबियांची साथ मिळेल. धीर सोडू नकात. येणाऱ्या आव्हानांचा सामना करा. आरोग्य सामन्य राहिल.

कर्क (Cacner) : दिवसाची चांगली सुरुवात होणार आहे. कामाच्याबाबतीत आणि कुटुंबियांकडून सहकार्य लाभेल. मंगळवार खऱ्या अर्थाने मंगळवार ठरेल. भाग्य सोबत असेल. नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. 

सिंह (Leo) : दिवसभर उत्साही राहाल. भाग्य तुमच्यासोबत आहे. कामात उत्साह जाणवेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मित्रांची किंवा ओळखीतील कोणाचीही भेट होईल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल.   

कन्या (Virgo) : कामात 100 टक्के समर्पणाणे स्वत:ला झोकून द्याल, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. धाडस आणि आत्मविश्वासात वाढ होईल.जीवनसाथी आणि पाल्याकडून चांगली बातमी मिळेल.   

तुळ (Libra) : कामकाजात यशस्वी व्हाल. नव्याने व्यवसाय करण्याची इच्छा होऊ शकते. भाग्य तुमच्यासोबत आहे. सर्वांसोबत चांगला व्यवहार होईल.   

वृश्चिक (Scorpio) : कौटुंबिक जीवनात चढ-उतार असतील. सामंजस्य आणि मेहनतीमुळे जीवन सुखी होण्यास मदत होईल. कार्यालयीन ठिकाणी तुमचं कौतुक होईल. भाग्यची साथ लाभेल. मित्र किंवा ओळखीतल्या लोकांसह वेळ व्यतीत होईल.

धनु (Sagittarius) : मन प्रसन्न राहिल. कुटुंबियांसह वेळ घालवाल. प्रवासाचा आनंद घ्याल. कामात चांगला लाभ होईल. तरीतरी जाणवेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.    

मकर (Capricorn) : आजचा दिवस तुमच्या स्मरणात राहिल. मधुर वाणी आणि हुशारीमुळे कामात यश मिळेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. आई-वडिलांकडून स्नेह मिळेल. पाल्यांकडून सुख मिळेल.

कुंभ (Aquarius) : दिवसभर उत्साह जाणवेल. नोकरीत यश मिळेल. व्यापारात धनलाभ होईल. कौटुंबिक वाद संपतील. आजचा दिवस फार चांगला असेल. तुम्ही जे जे कार्य कराल,  त्यात त्यात तुम्हाला दैवी साथ लाभेल. तुमच्या मेहनतीचं फल मिळेल.

मीन (Pisces) : कौटुंबिक जीवनात चढ-उतार राहिल. मेहनत आणि समजुतदारपणामुळे जीवन सुखमय होण्यास हातभार लागेल. कार्यक्षेत्रात तुमचं कौतुक होईल. . मित्र किंवा ओळखीतल्या लोकांसह वेळ व्यतीत होईल.