मुंबई: कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनिवार विशेष रुपात खास असणार आहे. प्रेमासाठी हा दिवस खूप चांगला आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला असणार आहे. बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया, गुरुवार 12 राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे.
मेष: शनिवारी भाग्य आपल्या सोबत असणार आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
वृषभ: कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. नशिबाची चांगली साथ मिळेल.
मिथुन: वागणुकीत बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. परिश्रमपूर्वक काम कराल. आपल्याला चांगले पैसे मिळतील.
कर्क: शनिवारी तुमचं भाग्य साथ देईल. प्रेमात संवेदनशिलता दिसून येईल. तुमची प्रतिभा फळाला येईल.
सिंह: तुम्हाला कामात चांगले यश मिळेल. तुमची मेहनत आणि नशीब दोन्ही उत्तम साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे आरोग्य बिघडू शकते.
कन्या: तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस खूप चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वडीलधाऱ्यांबद्दल आदर भावना वाढेल.
तुळ: बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून तुम्ही काम पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा असेल. तुमच्या घरातील शुभ कार्य पूर्ण होईल.
वृश्चिक: शनिवारी आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. हाती घेतलेलं काम पूर्ण होईल. इतरांबरोबर मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ होतील. कोर्टाच्या कटकटीपासून सुटका होईल.
धनु: कामासाठी शनिवार चांगला आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश नक्कीच मिळेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. खर्चात अनावश्यक वाढ होईल.
मकर: शत्रूंना पराभूत करण्यात यश मिळेल. नशीब तुमच्या सोबत असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत फिरायला बाहेर जाल. तुमचा दिवस आरोग्यासाठीही चांगला आहे.
कुंभ: चपळतेनं कामं पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना मोठं यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
मीन: अनावश्यक भांडणं टाळा.तुमचे आरोग्य चांगले राहील. नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळेल. शनिवार फायद्याचा ठरणार आहे.