Horoscope 11 December 2021 | या 2 राशींसाठी शनिवार धोकादायक, वाचा आजचं राशीभविष्य

एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊयात शनिवारचा (Horoscope 11 December 2021) दिवस कसा असेल. 

Updated: Dec 10, 2021, 10:51 PM IST
Horoscope 11 December 2021 | या 2 राशींसाठी शनिवार धोकादायक, वाचा आजचं राशीभविष्य    title=

मुंबई : तुम्ही वाहन चालवत असाल तर सावध रहा. शनिवारी तुमच्यासाठी धोकादायक आहे. धनु आणि मकर राशींसाठी शनिवार धोकादायक आहे. या दोन्ही राशीच्या लोकांचं रात्री अपघात होण्याची शक्यता आहे. एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊयात शनिवारचा दिवस कसा असेल. (Horoscope 11 December 2021  know your astrology prediction zodiac sign)

मेष (Aries) : अनेक योजनांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनात बदल होतील. व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. 

वृषभ (Taurus) : विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागणार नाही. गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे. भविष्य आणि आरोग्याबद्दल काळजी घ्याल.  

मिथुन (Gemini) : साहित्य, कला, लेखन, संगीत, सिनेमा आणि क्रीडा क्षेत्रातील लोकांना आपल्यातील कौशल्य किंवा उपजत गुण दाखवून देण्याची संधी मिळेल. कामात आणि व्यवसायात सकारात्मक विकास होईल.  

कर्क (Cancer) : शुभ कार्यात सहभागी व्हाल. नातेवाईकांशी भेट झाल्याने तुम्ही आनंदी असाल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल.   

सिंह (Leo) :  विचारपूर्वक गुंतवणूक करा. वडिलोपार्जित संपत्तीचा विषय निकाली लावण्यासाठी समजूतदारपणे निर्णय घ्या. अपेक्षित आर्थिक फायदा होणार नाही. 

कन्या (Virgo) : कायदेशीर बाबीत सावध रहा. आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. रिअल इस्टेटचे व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

तुळ (Libra) : संमिश्र वेळ आहे. तुम्ही चिंतेत असू शकता. अनावश्यक गोष्टीत तुम्ही फसून रहाल. आर्थिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही वेळ लागेल.   

वृश्चिक (Scorpio) : आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर प्रवास संभवू शकतो. तुमच्यासाठी हा एक सुखद अनुभव असेल. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. 

धनु (Sagittarius) : तुमची प्रकृती बिघडू शकते. तुमच्यासह जोडीदाराची तब्येतही अस्थिर राहिल. वाहन चालवताना सावध रहा.   

मकर (Capricorn) : नशिब तुमच्या सोबत आहे. रात्रीचा प्रवास टाळा. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. 

कुंभ (Aquarius) : नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. परदेशात जनसंपर्क असलेल्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

मीन (Pisces) :  कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.