Horoscope| नोकरी-व्यवसायात फायदा मिळवून देणार शनिवार, 4 राशीच्या व्यक्तींना राहावं लागेल सावध

कसा असेल 12 राशींसाठी शनिवारचा दिवस? 

Updated: Sep 10, 2021, 10:15 PM IST
Horoscope| नोकरी-व्यवसायात फायदा मिळवून देणार शनिवार, 4 राशीच्या व्यक्तींना राहावं लागेल सावध

मुंबई: शनिवारी दीड दिवसांच्या गणपतीला निरोप देण्याचा दिवस. मात्र शनिवारी अनेक राशीच्या लोकांचं मन प्रसन्न असेल. काही राशींना त्यांचं भाग्य साथ देईल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. कौटुंबिक जीवनात चढउतार येतील. 

मेष: उत्साहाने भरलेला शनिवारचा दिवस असणार आहे. भाग्य साथ देईल. कामाच्या ठिकाणी जोश पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये सफलता मिळेल. ओळखीच्या लोकांशी भेटीगाठीचा योग आहे. 

वृषभ: शनिवारचा दिवस पूर्ण ऊर्जेनं भरलेला राहणार आहे. मंगलकार्यात सहभागी व्हाल. मन प्रसन्न असणार आहे. कामात मेहनत केली तर फळ नक्की मिळणार आहे. 

मिथुन: कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळेल. कोणताही नवीन व्यवसाय करायचा विचार मनात येईल. आज आपलं भाग्य साथ देईल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. 

कर्क: मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबासोबत काही वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. दिवसाची सुरुवात चांगली होईल.

सिंह: कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. आज आपल्याला मेहनत आणि समजुदारीनं काम घ्यावं लागेल मात्र तसं केल्यानं फायदाच होईल. 

कन्या: दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामाच्या ठिकाणी असो किंवा कुटुंबात आज आपल्याला सुख मिळणार आहे. व्यापारी वर्गाला विशेष फायदा होऊ शकतो. 

तुळ: शनिवार तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. हजरजबाबीपणा बाळगावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी आपली स्तुती होईल. 

वृश्चिक: मंगल कार्यात सहभागी व्हाल. शनिवारी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. याशिवास सावध आणि सतर्क राहावं लागेल. 
 
धनु: दिवसाच्या शेवटी तुम्हाला कटकटीतून सटका मिळेल. शनिवाराचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. तुम्ही दिलेला सल्ला दुसऱ्यांच्या कामी येईल. 

मकर: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी खास नसणार आहे. तुम्हाला खूप संघर्ष आणि कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही हिंमत सोडून चालणार नाही. 

कुंभ: शनिवारी तुमचं काम चांगलं राहिल. बोलण्याची कला यशाच्या शिखरापर्यंत घेऊऩ जाईल. मानसिक शांतता मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. 

मीन: संपूर्ण दिवस तरतरी असेल. नोकरीमध्ये सफलता मिळेल. शत्रूंपासून सावध राहा आणि कौटुंबिक कलहापासून दूर राहा.