Horoscope Today 16 May 2022 : 'या' राशीच्या मंडळींना मिळणार मोठं यश, आनंदाचे क्षणही प्रतीक्षेत

एक लक्षात ठेवा, पाय तितकेच पसरा जितकी चादर आहे.   

Updated: May 16, 2022, 07:26 AM IST
Horoscope Today 16 May 2022 : 'या' राशीच्या मंडळींना मिळणार मोठं यश, आनंदाचे क्षणही प्रतीक्षेत  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मेष - आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. कर्जमुक्त होण्याचा दिवस आहे. आजारपण तुमच्यापासून आजच्याच दिवशी कायमचं दूर पळेल. एक लक्षात ठेवा, पाय तितकेच पसरा जितकी चादर आहे. 

वृषभ- समोरच्यांच्या बोलण्यावर फार लक्ष न देता पुढे जा... मानसिक शांतता मिळेल. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असल्यास त्याला अपेक्षित महत्त्वं द्यायला विसरु नका. 

मिथुन- नोकरीच्या ठिकाणी आज कामाचा अहवाल वाचला जाईल. तिथं तुमच्या वाट्याला यश येणार आहे. कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा नको. आनंदाच्या क्षणांची उधळण तुमच्यावर होणार आहे. 

कर्क- जीवनात ठरवलेलं लक्ष्य पूर्ण कराल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये समतोल राखण्याची कला शिकाल. तुमच्याकडे पाहून अनेकांनाच आदर्श मिळेल. 

सिंह - पुण्याची कामं कराल, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आधी केलेल्या सत्कर्मांची फळं तुम्हाला मिळणार आहेत. 

कन्या- घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. शत्रूची चाल वेळीच लक्षात आल्यामुळं संभाव्य धोकाही टळेल.  तुमच्या कौशल्यांना वाव मिळेल. 

तुळ- समाजात तुम्हाला मानाचं स्थान मिळणार आहे. अनेकदा लहानसे नफेही तुम्हाला आनंद देऊन जाणार आहेत. परिस्थिती सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. 

वृश्चिक - एखाद्या अॅलर्जीचा त्रास होईल, पण यावर फार लक्ष न दिल्यास आणि योग्य उपचार घेतल्यात तेसुद्धा बरं होईल. ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या. 

धनु- विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावं. येणारा काळ प्रगती करण्याचा आहे. चांगल्या संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत. कुटुंबीयांचं प्रेम आणि जिव्हाळा तुम्हाला बळ देणार आहे. 

मकर- मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या . जीवनात अचानकच आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभाचा योग आहे. त्यासाठी किंचित मेहनत करण्यापासून माघार घेऊ नका. 

कुंभ- कुटुंबात कोणा जवळच्या व्यक्तीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. गुरुतुल्य व्यक्तींचा आदर करा, त्यांच्या आशीर्वादानं तुमचा फायदा होणार आहे. 

मीन- आरोग्य स्थिर असेल. कुटुंबातील वाद निकाली निघतील. प्रगती करण्याची संधी आहे. आर्थिक लाभ होण्यासाठी योग्य ग्रहदशा आहे.