Horoscope 17 October 2021: 3 राशीच्या व्यक्तींना राहावं लागणार अलर्ट, या चुका करू नका

वृषभ, तुळ आणि मिथुन राशीच्या लोकांनी थोडे सावध राहण्याची गरज

Updated: Oct 16, 2021, 11:02 PM IST
Horoscope 17 October 2021: 3 राशीच्या व्यक्तींना राहावं लागणार अलर्ट, या चुका करू नका

मुंबई: रविवारी तुम्ही कोणतेही काम करताना तुम्हाला मदत मिळणार आहे. कामात धनप्राप्ती होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुम्ही दिवसभर आनंदी व्हाल आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी कायम राहील. दुसरीकडे वृषभ, तुळ आणि मिथुन राशीच्या लोकांनी थोडे सावध राहण्याची गरज आहे. खगोल गुरु बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून 12 राशींसाठी दिवस कसा असणार जाणून घेऊया. 

मेष: रविवार चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत सकारात्मक परिणाम पाहता येतील. कौटुंबिक आनंद मिळेल आणि दिवस चांगला जाईल. 

वृषभ: दिवसाची सुरुवात चांगली होईल. लोकांकडून आपल्याला आपुलकीची भावना दिसेल. कामात धनप्राप्ती होईल. रविवार हसण्यात घालवला जाईल. फक्त आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या.

मिथुन: रविवारी कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. तुमचे कामही चांगले राहील. पैसे असतील, पण अचानक खर्चही होतील. जर तुम्ही हुशारी वापरून काम केले तर तुम्हाला त्यात यश मिळेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल.

कर्क: रविवार तुमच्यासाठी अद्भुत असणार आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या मेहनतीचे आणि अथक प्रयत्नांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

सिंह: आपल्याला चांगलं यश मिळणार आहे. आपल्याला सामंजस्य दाखवावं लागेल. रविवार या राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम राहील. आरोग्य चांगलं राहील. 

कन्या: कामासाठी दिवस चांगला असणार आहे. मूड चांगला राहील. प्रवासाचा योग आहे. 

तुळ: तुमचा दिवस खूप तणावपूर्ण असेल. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. नफ्याचा दिवस आहे असं समजायला हरकत नाही. 

वृश्चिक: शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात पुढे असाल. रविवारी भाग्य तुमची साथ देईल. प्रगतीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

धनु: रविवारी तुम्ही तुमच्या कामात चांगली प्रगती कराल. परिणामी तुम्हाला चांगला नफा मिळेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

मकर: भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती कराल. हाती घेतलेल्या कामात चांगलं यश मिळेल. 

कुंभ: मित्रांसोबत प्रवास होईल. कामाच्या ठिकाणी चांगली स्थिती राहील. चांगल्या लोकांशी संपर्क कराल. 

मीन: रविवारी आपल्याला चांगली बातमी मिळू शकते.