Horoscope 18 November : बिघडलेली कामं मार्गी लागतील, या राशींसाठी शुभ दिवस

या राशीच्या व्यक्तींसाठी दिवस खूप चांगला असणार आहे.... 12 राशींसाठी कसा असेल दिवस पाहा 

Updated: Nov 17, 2021, 11:18 PM IST
Horoscope 18 November : बिघडलेली कामं मार्गी लागतील, या राशींसाठी शुभ दिवस title=

मुंबई: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. कधी आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येतो तर कधी संकटांचा डोंगर. ग्रहांच्या बदलत्या हालचालींमुळे आपला प्रत्येक दिवस वेगळा असतो. कधी यश मिळते तर कधी दिवस साधारणपणे जातो. ज्योतिषी बेजान दारूवाला यांचा मुलगा ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया कसा असणार तुमचा गुरुवारचा दिवस.

मेष: तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. 

वृषभ: हुशारीनं काम केलं तर आर्थिक स्थिती चांगली राहील. हुशारीनं काम केलं तर तुम्हाला फायदा होईल. 

मिथुन: तुम्हाला एक नवी दिशा मिळू शकते. मेहनतीनुसार मोबदला न मिळाल्याने निराशा होऊ शकते.

कर्क: छंद पूर्ण करण्यात तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस घालवू शकता. व्यवसायात नफा मिळू शकतो. बेरोजगारांना इच्छित नोकरी मिळू शकते.

सिंह: तुमचा दिवस चांगला जाईल. रखडलेली योजना पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे. व्यवहाराशी संबंधित कामे पूर्ण होऊ शकतात.

कन्या: तुमच्यासाठी दिवस खूप चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. खरेदी करण्यासाठी महिला खरेदी करू शकतात.

तुळ: तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळेल. नवीन ध्येय ठेवण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदार तुमच्या वागण्याने प्रभावित होईल. 

वृश्चिक: गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी शांततापूर्ण जाईल. पैशाची तुमची चिंता दूर होऊ शकते.

धनु: व्यावसायिकांसाठी दिवस चांगला असणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात त्याच प्रकारचे काम करताना थोडा कंटाळा येऊ शकतो.

मकर: तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्राच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ: कामाच्या ठिकाणी चांगला लाभ मिळू शकतो. विमान प्रवास होण्याचा योग आहे. विवाहाचा योग आहे. 

मीन: तुमच्यासाठी दिवस खूप चांगला आहे. व्यावसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. करियरची संधी मिळू शकते.