जुलै महिन्यात 'या' राशींना नोकरीची संधी, आर्थिक भरभराटीचे संकेत

12 जुलैपासून या लोकांवर शनीची कृपा बरसणार! नवी नोकरी पैसा होणार अनेक फायदे

Updated: Jun 27, 2022, 04:39 PM IST
जुलै महिन्यात 'या' राशींना नोकरीची संधी, आर्थिक भरभराटीचे संकेत title=

मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे संक्रमणाचा खूप फायदा होतो. शनि सारख्या अत्यंत महत्त्वाचा ग्रह असेल तर त्याचा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी शनि स्वतःच्या राशी कुंभ राशीत प्रतिगामी वाटचाल करत आहे.

12 जुलै 2022 रोजी शनि मकर राशीत प्रतिगामी अवस्थेत प्रवेश करेल. या काळात काही राशींवर शनि खूप दयाळू असेल. जाणून घ्या शनि गोचर कोणत्या राशीसाठी शुभ ठरेल.

मेष - 12 जुलैपासून या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. वेगवेगळ्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येणार आहेत. अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरीचा शोध संपले, नव्या नोकरीची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. मेहनतीचं योग्य फळ मिळेल. 

सिंह- आयुष्यात मोठे बदल होतील. प्रमोशन पगारवाढीचे संकेत आहेत. नोकरीची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. मेहनतीचं योग्य फळ मिळेल.

कन्या- शनि राशी परिवर्तन या राशीसाठी फायदेशीर ठरू शकतं. आर्थिक फायदा होणार आहे. नोकरीमध्ये मोठा फायदा होईल. प्रमोशनची शक्यता आहे. 

तुळ- नवीन नोकरी मिळण्याची खात्री आहे. आर्थिक प्रगती होईल. उत्पन्न वाढेल. अडकलेला पैसा सापडेल. एकंदरीत दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. समस्या सुटतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल.

धनु- धनु राशीच्या लोकांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर करेल. आत्मविश्वास वाढेल आणि एकामागून एक यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल.